जुनी पेन्शन नसलेल्या सभासदांचे आकस्मिक निधन झाल्यास संस्थेमार्फत त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये देणार- मनपा शिक्षक पतसंस्थेचा निर्णय
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था यांच्यावतीने १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीस लागलेल्या सभासदांना जुनी पेन्शन नाही . अशा सभासदाचे दुर्दैवी निधन झाल्यास पतसंस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेण्यात आला . त्याचबरोबर सभासदांच्या औषधोपचारासाठी तातडीची मदत, अन्य सभासदाचे निधन झाल्यास एक लाख रुपये मदत त्यांच्या कुटुंबीयांना देण्याचाही निर्णय झाल्या आहे .संस्थेने कर्जाचा व्याजदर ९.७५ असा केलेला आहे त्याचबरोबर सभासदांना कोवीड लोन, फेस्टिवल लोन देण्याचीसोय करण्यात आलेली आहे .त्याचबरोबर सभासदांच्या पाल्यांच्या लग्नासाठी पाच हजार एक रुपये आहेर भेट देण्यात येते .संस्थेच्या प्रगतीबद्दल व सभासदांना देण्यात येणार्या सोयीसुविधा बद्दल सभासदांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे . संस्थेचा कारभार अत्यंत काटकसरीचा असून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध असून तातडीने कर्ज मंजुरीचे निर्णय घेतले जातातअशी माहिती सभापती संजय पाटील ,उपसभापती मनोहर शिंदे ,मानद सचिव सुधाकर सावंत, खजानीस उमेश देसाई यांनी दिली . यावेळी संचालक उत्तम गुरव, प्रकाश पाटील ,संजय कडगावे, वसंत आडके, सुभाष धादवड, आशालता कांजर ,सरिता सुतार ,शिवराज नलवडे,राजेंद्र गेजगे, दिलीप माने ,विजय माळी, शकील भेंडवडे, विजय जाधव उपस्थित होते.