Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याप्रा. सौरभ जोशी यांना यंग सायंटिस्टक अवॉर्ड

प्रा. सौरभ जोशी यांना यंग सायंटिस्टक अवॉर्ड

प्रा. सौरभ जोशी यांना यंग सायंटिस्ट अवॉर्ड

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर मधील प्रख्यात अभियांत्रिकी महाविद्यालय केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील प्रा. सौरभ संजय जोशी, पर्यावरण अभियांत्रिकी शाखा यांना चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय शारुाीय संशोधन संस्थेमार्फत वर्ष २०१९-२० चा यंग सायंटिस्ट हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदरचा पुरस्कार हा दरवर्षी अभियांत्रिकी, शास्त्र आणि औषध संशोधन या क्षेत्रामधून उत्कृष्ट कामगिरी असणा-या संशोधकांना दिला जातो. यासाठी पेपर पब्लिकेशन, कॉन्फरन्स वर्कशॉप, सेमिनार्स, कन्सलटन्सी, एडिटोरियल व रिव्हुवर बोर्ड मेंबर व इतर निकषांमधून निवड केली जाते.
प्रा. सौरभ जोशी केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे पर्यावरण अभियांत्रिकी शाखेमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांना विभागप्रमुख डॉ. अक्षय थोरवत, प्रा. रवि निकम, डॉ. एस.एस.शहा तसेच संचालक डॉ. विलास व्ही.कार्जिन्नी व अध्यक्ष मा. भरत पाटील, उपाध्यक्ष मा. सुनिल कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले व इतर विश्वस्त यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments