“माहिती व कार्यदिशा” पुस्तिकेचे मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन
कोल्हापूर/प्रतिनिधी : २४ डिसेंम्बर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कोल्हापुर जिल्हा शाखेच्या वतीने कोल्हापूर येथील जिल्हधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मा. दौलत देसाई साहेब यांच्या हस्ते ग्राहकांच्या माहिती आणि अधिकारासाठी माहिती व कार्यदिशा या पुस्तिकेचे प्रकाशन केले गेले. ग्राहकांना आपले हक्क आपले अधिकार या संबंधी जागरूकता निर्माण व्हावी त्यांची होणारी लुट थांबावी यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने ग्राहकांच्या प्रबोधनासाठी काढलेली पुस्तिका कौतुकास्पद आहे असे मा.जिल्हाधिकारी यांनी आपले मत व्यक्त केले.यावेळी जिल्हाधिकारी यांनी ग्राहक पंचायत चे कार्य उत्कृष्ट व समाधानकारक चालु असुन या चाललेल्या कार्यात सातत्य ठेऊन आपण ग्राहकांची जनजागृती करावी त्यांचे प्रश्न सोडवावेत त्यांना योग्य तो न्याय मिळवुन द्यावा त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हवी ती मदत करण्याची ग्वाही या वेळी त्यांनी दिली. तसेच शालेय विद्यार्थ्याच्या मार्फत दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंचे नमुने घेऊन होणाऱ्या भेसळीची शहानीशा करून अन्नभेसळ विभागा मार्फत कारवाई करण्यात येईल. यासाठी सन २०२०-२१ साला मध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र व जिल्हा प्रशासना मार्फत मोहिम राबवणेत येईल असा संकल्प या वेळी करणेत आला.
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापुर शहराचे अध्यक्ष अशोक पोतनीस यांनी केले.तसेच मा. जिल्हाधिकारी यांचे स्वागत कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष बी.जे.पाटील यांनी केले तसेच त्यांनी ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्ह्या शाखेच्या कार्यचा आढावा मांडला . याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पाटील व संघटक सुरेश माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन शहर अध्यक्ष अशोक पोतनीस यांनी केले व आभार जिल्हा सल्लागार सुधाकर भदरगे यांनी मांडले. या प्रसंगी जिल्हा सचिव दादासो शेलार,संघटिका पुनम देसाई,सह.संघटिका प्रमोदिनी माने ,सदस्य संजय पोवार, इचलकरंजी शाखेचे अध्यक्ष सुरेंद्र दास,सदस्य विजय पाटील, सारंग दास, करवीर शाखेचे यशवंतराव शेळके, शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष सदाशिव आंबी,कागल शाखा अध्यक्ष तुकाराम पाटील,पन्हाळा शाखा अध्यक्ष बाजीराव कदम, शहर उपअध्यक्ष इ.जी खोत, दीप्ती कदम,माधुरी मोळे, गोरख कांबळे,सचिन गणबावले, मनीषा जाधव तसेच पदाधिकारी उपस्थित होते.