Sunday, October 27, 2024
Home ताज्या ध्यानासाठी मोफत ऑनलाईन महाशिबीर

ध्यानासाठी मोफत ऑनलाईन महाशिबीर

ध्यानासाठी मोफत ऑनलाईन महाशिबीर

कोल्हापूर/प्रतिनिधी : यंदाचे पूर्ण वर्ष कोरोना संसर्गाच्या विरुध्द लढण्यासाठी जात आहे. संपूर्ण जग त्याचा प्रतिकार करत असताना अशावेळी स्वत: ला शांत ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे नियमित ध्यान. हिमालयातील ८०० वर्षे जुना पौराणिक ध्यान संस्कार ग्रहण करण्याची नि:शुल्क ऑनलाईन संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी २३ ते ३० डिसेंबर रोजी सकाळी ६ ते ८ व  पुनःप्रक्षेपण संध्याकाळी ६ ते ८  असे ऑनलाईन आठ दिवसाचे महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे.
शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशनचे अंबरीश मोडक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. हिमालयातील हा ध्यान प्रकार ८०० वर्षापूर्वीचा आहे. प्रत्येक मनुष्य कुठल्याही किचकट पध्दती अथवा साधनेशिवाय ध्यान करु शकतो. साधनेद्वारा प्राप्त केलेले हे आध्यात्मिक गूढ ज्ञान सोप्या भाषेत अवघ्या आठ दिवसात सांगितले जाणार आहे.
यादरम्यान दररोज स्वामींजी बरोबर लाखो लोकांच्या समूहाने ध्यान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ‘गुरुतत्व’ हा शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशनद्वारा संचलित एक वैश्विक मंच आहे. ‘गुरुतत्व’ नावाचे फेसबुक, यूट्युब चॅनल, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर सर्व माहिती उपलब्ध आहे. इच्छुकांनी माहिती पाहून सहभागी व्हावी, असे आवाहन करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments