डॉक्टरकडून दहा लाखाची लाच घेणाऱ्या आयकर निरीक्षक अधिकाऱ्याला कोल्हापुरात अटक,सापळा रचून केली कारवाई
कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉक्टराविरुद्ध आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी दहा लाखाची लाच घेणाऱ्या आयकर निरीक्षक या अधिकाऱ्याला कोल्हापुरात रंगेहाथ पकडण्यात आले लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विल्सन पुलाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली तक्रारदार हे होमिओपॅथिक डॉक्टर असून त्यांनी डॉक्टरी पेशातून गैरमार्गाने प्रॉपर्टी मिळवल्याची तक्रार आयकर विभागाकडे होती त्यानुसार आयकर निरीक्षक प्रताप महादेव चव्हाण वय ३५ याची चौकशी करत होते तक्रारदार यांच्याशी दोन दिवसापूर्वी संपर्क साधून चव्हाण यांनी संबंधित डॉक्टरांना टाकळा येथील कार्यालयात भेटण्यास बोलाविले होते. यावेळी अर्जदारांच्या विरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारी बाबत चर्चा करून व तक्रारदाराने गेल्या सहा वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्नस भरले नसल्याने ५० लाख रुपये दंड होणार असल्याचे सांगितले.ही दंडात्मक कारवाई करावयाची असल्यास २० लाख रुपयांची मागणी केली तडजोडी अंती १४ लाख रुपये देण्याचे ठरले या प्रकरणी तक्रारदाराने आयकर निरीक्षक प्रताप चव्हाण यांच्याविरुद्ध कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो कडे ( लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) तक्रार केली तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून पंच साक्षीदारांसमक्ष लाचेच्या मागण्याची पडताळणी केली असता आयकर निरीक्षक प्रताप चव्हाण यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी आज आयकर निरीक्षक प्रताप चव्हाण यांच्याविरुद्ध विल्सन पूल कोल्हापूर येथे सापळा रचून ही कारवाई केली.
प्रताप चव्हाण यांनी मागणी केलेली रक्कम यापैकी पहिला हप्ता म्हणून १० लाख रुपये रक्कम स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले या प्रकरणी चव्हाण यांच्याविरुद्ध शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ( लाच लुचपत प्रतिबंधक विभाग)पुण्याचे राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग)पुण्याचे सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत श्याम बुचडे संजू बंबरगेकर अजय चव्हाण, मयुर देसाई रुपेश माने संग्राम पाटील सुरज अपराध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांनी ही कारवाई केली.