आयटीआयतर्फे स्वच्छता अभियान
कोल्हापूर, दि. १६ (जिल्हा माहिती कार्यालय): शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) एनएसएस विभाग व महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर चौक ते कळंबा कारागृह परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात जवळपास दोन टन कचऱ्याची महापालिका आरोग्य विभागाकडून विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता अभियानात पदपथाच्या बाजूला वाढलेली अनावश्यक झुडपे, पालापाचोळा काढण्यात आला. यावेळी प्राचार्य रविंद्र मुंडासे, उपप्राचार्य दत्तात्रय पाठक, महापालिका मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, एनएसएस प्रमुख अमोल आंबी, उत्तम माने, स्वयंसेवकांसह कार्यालयीन पदाधिकारी, गटनिदेशक, निदेशक, प्रशिक्षण अधिकारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी उपस्थित होते.