दिल्लीत सुरू असणाऱ्या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार
कोल्हापूर/प्रमोद जोगळेकर : केंद्र सरकारने केलेल्या कृषी विषयक कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी देशभर शेतकरी आंदोलन करीत आहेत जवळजवळ वीस दिवस झाले हे आंदोलन दिल्ली येथे सुरू आहे मात्र केंद्र शासनाला या आंदोलनाची दखल घ्यावीशी वाटली नसल्याने हे आंदोलन तीव्र होत चालले आहे या आंदोलनामध्ये केंद्र सरकार कोणताही ठोस निर्णय देत नसल्याने आंदोलनाची व्याप्ती आता अधिकच वाढू लागली आहे संपूर्ण देशभर हे आंदोलन तीव्र होत चालले असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप होत आहे मात्र हे केंद्र सरकार कधी जागे होणार अशीही विचारणा केली जात आहे या आंदोलनाला विविध संघटनांनी पक्षांनी पाठिंबा दिला आहे मात्र तरीही केंद्रात सत्तेवर असणारे भाजप सरकार याचा खोल विचार करत नसल्याचे चित्र असल्याने कृषिप्रधान भारत देशामध्ये शेतकऱ्याला असे वाट पाहावी लागत असल्याचे पहावयास मिळत आहे कृषी विषयक कायदे हे शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे कायदे आहेत त्यामुळे हे कायदे रद्द करावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे मात्र केंद्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने आता केंद्र सरकार विषयी संतप्त भावना लोकांच्या मनामध्ये व शेतकऱ्यांच्या मनामध्ये उमटत आहे कष्ट करून शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध पिकांचे उत्पादन घेत असतो मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे शेतकरी टिकला तरी या ठिकाणचा माणूस टिकणार आहे त्याला खायला धान्य मिळणार आहे शेतकऱ्यांना जगणे मुश्कील होणार आहे त्यामुळेच होणारा उद्रेक विचार करता केंद्रशासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात भाजप सरकारला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे असे चित्र निर्माण होत चालले आहे.कृषी कायद्याबरोबरच ज्या ठिकाणी शेतकरी आपला माल एकत्र घालतो अशा बाजार समितीतही बंद करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला असल्याने आता शेतकऱ्यांना आपला माल एका जागी विकता येणार नसल्याचेही चित्र असल्याने शेतकऱ्यांच्या तुंनाही याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठविला आहे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली प्रसंगी पोलिसांची दोन हात केले शेतकर्यांच्या बाजूने लढा पुकारला आताही लढा सुरू आहे तरी गेंड्याच्या कातडीचे केंद्रशासन शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करण्यास तयार असल्याचे पहावयास मिळत आहे शेतकरी आता संतापला असुन निवडणुकांमध्ये सरकारविरोधात असणारा रोष पाहावयास मिळणार आहे. सध्या दिल्लीत सुरू असणारे आंदोलनाचे शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी आता कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे