गोकुळश्री’ स्पर्धेत गडहिंग्लजच्या सौ.वंदना जरळी यांची म्हैस प्रथम तर क. सांगावचे श्री.किरण चौगले यांची गाय प्रथम क्रमांक प्राप्त
कोल्हापूर/ ता.१४/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्पादन वाढीसाठी व उत्पादकांना प्रोत्साहन देणेसाठी प्रत्येक वर्षी गायी व म्हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्पर्धा घेणेत येते, सन २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये एकूण ७८ म्हैस व गाय दूध उत्पादकांनी उत्साहाने भाग घेतल्याने स्पर्धेत चुरस निर्माण झाली होती. सदरची स्पर्धा दिनांक ०७/११/२०२० ई रोजी घेण्यात आली असून, त्यामध्ये लक्ष्मी विकास सेवा संस्था गडहिंग्लजच्या म्हैस उत्पादक सौ.वंदना संजय जरळी यांच्या म्हैशीने एका दिवसात १९.५४० लि. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला तर गार्इमध्ये जनसेवा सह.दूध व्याव. संस्था दूधगंगानगर क.सांगाव येथील उत्पादक श्री. किरण शांतिनाथ चौगले यांच्या गायीने ३७.२१५लि. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला.
गोकुळशी सलग्न असणा-या सर्व प्रथमिक दूध संस्थांच्या सभासदां करीता या स्पर्धा प्रतिवर्षी घेण्यात येतात. ‘गोकुळश्री’स्पर्धेचा प्रमुख उदेश दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे,जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढवणे याचबरोबर दुग्ध व्यवसायामधुन दूध उत्पादकांना जास्तीत-जास्त लाभ करून देणे तसेच तरूण पिढीला या व्यवसायकडे आकर्षित करून दूध व्यवसाय वाढविणे हा आहे. गोकुळने ही स्पर्धा गोल्या २८ वर्षापासून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सुरू केलेली आहे.
स्पर्धेमध्ये १ ते ३ क्रमांक असलेले म्हैस व गाय उत्पादक स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे- अ.नं संस्थेचे नाव गाव तालुका स्पर्धकाचे नाव दिवसाचे दूध लि.मिली क्रमांक
बक्षीस रक्कम सन २०२०-२१ मधील म्हैस गटातील विजेते दूध उत्पादक १. लक्ष्मी गडहिंग्लज गडहिंग्लज वंदना संजय जरळी
१९.५४० प्रथम २५०००, हरहर महादेव चिखली
कागल अमर यशवंत पाटील १९.१३० द्वितीय २००००, लक्ष्मी गडहिंग्लज गडहिंग्लज वंदना संजय जरळी १९.०१० तृतीय १५०००
सन २०२०-२१ मधील गाय गटातील विजेते दूध उत्पादक जनसेवा दूधगंगानगर क.सांगाव कागल किरण शांतीनाथ चौगले ३७.२१५ प्रथम २००००,माणगांव, माणगांव हातकणंगले अमोल पारीसा मगदूम ३४.८०५ द्वितीय १५००० गांगोलिंग श्रीनगर व्हनगुती भुदरगड
अनिकेत अजित पाटील ३२.३५० तृतीय
१०००० या स्पर्धा अत्यंत निकोप व व्यवस्थीत पार पाडण्यासाठी गोकुळच्या दूध संकलन विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. यासाठी स्थानिक गांव पातळीवरील प्राथमिक दूध संस्थेतील संचालकांचेही सहकार्य घेतले जाते. या स्पर्धेमुळे दूध उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे. तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व दूध उत्पादक व ज्यांनी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेले दूध उत्पादक अभिनंदनास पात्र असून पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी ‘गोकुळश्री’स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन चेअरमन मा.श्री.रविंद्र आपटेसाहेब यांनी केले आहे. दूध उत्पादकांचा या स्पर्धेतील वाढता सहभाग पाहता गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक आपल्या जनावरांतील उत्पादन क्षमता वाढीसाठी प्रयत्नशिल असल्याचे दिसून येते असे कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर यांनी यावेळी नमूद केले.