Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्यासरपंच पदासाठीची मंगळवारी होणारी आरक्षण सोडत आता १५ जानेवारीनंतर -जिल्हाधिकारी दौलत देसाई

सरपंच पदासाठीची मंगळवारी होणारी आरक्षण सोडत आता १५ जानेवारीनंतर -जिल्हाधिकारी दौलत देसाई

सरपंच पदासाठीची मंगळवारी होणारी आरक्षण सोडत आता १५ जानेवारीनंतर
-जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर, दि. ११ (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायती मध्ये सन २०२० ते २०२५ साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसधारण स्त्री सरपंच पदासाठी मंगळवार, १५ डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाणार होती. परंतु, आता ही सोडत  ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर म्हणजेच १५ जानेवारी २०२१ नंतर होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या घोषित कार्यक्रमच्या मतदानानंतर म्हणजेच १५ जानेवारी २०२१ नंतर सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments