Sunday, December 22, 2024
Home ताज्या बायकोला हवं तरी काय'मध्ये श्रेया, अनिकेत लावणार 'लुक्स'ने तडका

बायकोला हवं तरी काय’मध्ये श्रेया, अनिकेत लावणार ‘लुक्स’ने तडका

बायकोला हवं तरी काय’मध्ये
श्रेया, अनिकेत लावणार ‘लुक्स’ने तडका

कोल्हापूर/ ८ डिसेंम्बर(प्रतिनिधी) नुकतीच एमएक्स प्लेयर एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची प्ले ओरिजनल‘बायकोला हवं तरी काय’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. श्रेया बुगडे, अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिरीजचे दिग्दर्शन बहुआयामी अशा प्रियदर्शन जाधवने केले आहे. या वेबसिरीजला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून याचे  मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अनिकेत विश्वासराव आणि श्रेया बुगडे यांचे वेगवेगळे ‘लुक्स’ या एकाच वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

एमएक्स प्लेयरने आपल्या प्रत्येक वेबसिरीजमध्ये नावीन्य राखत प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा अविरत जपला आहे आणि यापुढेही तो जपणार आहेत. एमएक्स प्लेयरच्या’आणि काय हवं’ ते अगदी अलीकडच्या’समांतर’ या वेबसिरीजपर्यंतच्या सर्वच सिरीज आणि त्यांचे विषय अतिशय वेगळे आणि आता पर्यंत कधीही न पाहिलेले असे होते. आताच प्रदर्शित झालेल्या ‘बायकोला हवं तरी काय’ ही वेबसिरीजसुद्धा अशीच हटके आहे.
या वेबसिरीजचे अजून एक खासियत  म्हणजे कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आणि हँडसम अनिकेत विश्वासराव ही नवीन आणि फ्रेश जोडी. या वेबसिरीजबद्दल सांगताना श्रेया म्हणाली, ” मी यात एका सामान्य गृहिणीची भूमिका निभावत आहे. तिला तिच्या नवऱ्याने अपग्रेड व्हावे असे वाटत असते. त्यासाठी ती देवाजवळ नेहमी मागणे मागते. तेव्हा तिला देव प्रसन्न होतो आणि त्यानंतर जी मजा यायला सुरुवात होते यावर ही  सिरीज आहे.”
अनिकेत त्याच्या भूमिकेबद्दल सांगतो, ‘मी खूप भाग्यवान आहे की मला एकाच वेबसिरीजमध्ये अनेक भूमिका निभावण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रेक्षकांना प्रत्येक भागात नवीन काहीतरी पाहायला मिळणार हे नक्की. ही सिरीज करताना खूप मजा आली. शिकायला मिळालं. सिरीज बघतांना सर्व स्त्रियांना आणि पुरुषांना आपल्यासोबतसुद्धा असे घडले तर? असे वाटेल. सर्वांची मने जोडणारी अशी ही सिरीज आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments