Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याडी. वाय. पाटील ग्रुपतर्फे शहीद संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांकडे ३ लाखाचा धनादेश...

डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे शहीद संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांकडे ३ लाखाचा धनादेश सुपूर्द

डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे शहीद संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांकडे ३ लाखाचा धनादेश सुपूर्द

कोल्हापूर/प्रतिनिधी : जम्मू-काश्मीर मध्ये भारतमातेच्या रक्षणासाठी लढताना कोल्हापूर दक्षिण मधील निगवे खालसा गावचे सुपुत्र जवान संग्राम पाटील यांना काही दिवसांपूर्वी वीरगती प्राप्त झाली. पाटील कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण कोल्हापूरकर उभे आहेत.
शहीद जवान कै. संग्राम पाटील यांच्या अपुऱ्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी आज डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे आम.ऋतुराज पाटील यांनी रुपये ३ लाखांचा धनादेश पाटील कुटुंबियांना सोपविला.
याप्रसंगी करवीरचे माजी उपसभापती सागर पाटील,अशोक किल्लेदार, टी.वाय.पाटील, शाहजी किल्लेदार, पी.एम.पाटील, एल.एस.किल्लेदार, जी.जी.पाटील, विलास कांजर, प्रवीण पाटील, संतोष किल्लेदार, संतोष ऱ्हाटोड, राहुल पाटील, संजय गुरव, गजानन पाटील, एकनाथ पाटील, डी.एस.ढगे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments