Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यापुणे पदवीधर मतदारसंघात तब्बल ६२ उमेद्वारापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण लाड यांचा...

पुणे पदवीधर मतदारसंघात तब्बल ६२ उमेद्वारापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण लाड यांचा घवघवीत विजय

पुणे पदवीधर मतदारसंघात तब्बल ६२ उमेद्वारापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण लाड यांचा घवघवीत विजय

कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजपला चितपट करत पुणे पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण लाड यांनी भाजपाचे नितीश देशमुख यांचा पराभव केला.या मतदारसंघात तब्बल ६२ उमेदवार यंदा आमदार होण्यासाठी निवडणुकीत होते. यापैकी १२ उमेदवार हे पक्षाकडून आहेत तर अपक्ष उमेदवारांची संख्या ५० इतकी आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरुण लाड यांनी तब्बल ४८, ८२४ मतांनी विजय मिळवत निवडणूक एकतर्फी जिंकली. महाविकास आघाडीच्या झंझावातापुढे अन्य पक्षीय व अपक्ष उमेदवार भुईसपाट झाले. ३१ उमेदवारांना मतांची शंभरी गाठता आली नाही. अरुण लाड यांना १, २२, १४५ तर भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते मिळाली. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये लढत झाली. अन्य उमेदवार खूपच पिछाडीवर राहिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अॅड. रुपाली पाटील-ठोंबरे ( पुणे, ६७१३) यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. पहिल्यांदा राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितलेल्या व नंतर अपक्ष म्हणून निवडणुकीत हवा निर्माण केलेले इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांना ६५७२ तर ‘नंदादीप प्रतिष्ठान’च्या नीता ढमाले यांना ५३२ मते घेतली. माजी आमदार व जनता दल सेक्युलरचे उमेदवार प्रा.शरद पाटील (कुपवाड, मिरज ४२५९) इतकी मते मिळाली. पाटील यांनी यापूर्वी एकदा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.
आम आदमी पक्षाचे डॉ. अमोल रामचंद्र पवार (पलूस,११२१), अखिल भारत हिंदू महासभेचे कपिल शंकर कोळी (सोलापूर, २१८), प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे कृपाल कृष्णराव पलूसकर (मांजरी,जि.पुणे, ७८), संभाजी ब्रिगेड पार्टीचे इंजिनीअर मनोज गायकवाड (पुणे, ८४३), नेताजी काँग्रेस सेनेचे मिलिंद काशिनाथ कांबळे (उल्हासनगर, ७८),प्रजासत्ताक भारत पक्षाचे देशसेवक लक्ष्मण आण्णासाहेब चव्हाण (कोथरुड, १३०), वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ जनार्दन साळुंखे (कवठेएकंद, ता. तासगाव ३१३९), इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टीचे अॅड. हनीफा अ. खान (पुणे ७९) यांचा फारसा प्रभाव नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये ५० अपक्ष उमेदवार होते. यामध्ये डॉ. अभिजित बळीराम साठे (सोलापूर, ८३), अभिजित वामनराव बिचकुले (सातारा, ५६), अमर संतोष माने (उजळाईवाडी, ५१), अरुण लाड (पुणे २५५४), आसीफ महीबूब शेख (केम, तो करमाळा, १३४), प्रा. निळकंठ काशीनाथ खंदारे (सांगोला, २८४), गणेश जगदीश काकडे (वाणेवाडी, ७०), गणेश सुखदेव काटकर (वडजल, ७३ ), गोवर्धन महेंद्र राजेशिर्के (मोरेवाडी, ता. करवीर, १८१), चंद्रकांत परमेश्वर सावंत (पुणे, ४५), जयंत रामचंद्र पाटील (तांबवे, ३२), जयंत शंकर विभूते (कृष्णानगर, पुणे, ४०), धनंजय बाळकृष्ण गोंदकर (विश्रामबाग सांगली, ९८९), नितीन महादेव माने (सातारा, ४७), प्रविण भिमराव पाटील (कामेरी, १७७), बसवराज लिंगराज हिरेमठ (नागणसूर, २४), बळवंत बाबूराव पोवार (पुनाळ, ६३), प्रा. बापू बाबासाहेब चंदनशिवे (बोहाळी, १०६), बाळकृष्ण ज्ञानू यमगर (सांगली, ३८७), निशा अनिल बिडवे ( पुणे, ३४१), भारत बाबूराव व्यवहारे (रोपळे, ४२), महारुद्र कडाजी तिकुंडे (संगमनेर, ७१), महेश दशरथ म्हस्के (पुणे, १५ ), माणिक नामदेव बनकर (सैदापूर, ता. कराड, ६४), प्राचार्य मानसिंग कृष्णराव जगताप (राजारामपुरी कोल्हापूर, ४९), मुकूंद हणमंत जाधवर (वालवड, ता. बार्शी, २१८), अॅड. मंगेश तुकाराम महामुलकर (महामुलकरवाडी, जि. सातारा, १०४), युवराज उत्तम पवार ( पुणे, ५२०), योगेश सुभाष ढगे (पुणे, ४७), राकेश सुभाष कांबळे (बावडा, ता. इंदापूर, ४५), अॅड. राजाराम शामराव पाटील (कुरळप, ९९), अॅड. राजीव वसंतराव चव्हाण (वडूज, ४६), विजय शामराव लेंगरे (झिंजेवस्ती, ता. माळशिरस, ३९), विजयकुमार आप्पासाहेब पाटील (आटपाडी, ३५), शाहिदअहमद हयातचांद पिरजादे (चांद कॉलनी म्हैशाळ रोड, ८०), अभिजित विलासराव शिंदे (बोरगाव, ता. वाळवा, २४१), प्रा. शिवाजीराव ज्ञानदेव बंडगर (ढोकरी, ता करमाळा, ४६१), शंकर लखू पुजारी (सांगली, १४०), सचिन निवृत्ती शिंदे (आंबेगाव पठार पुणे, ५३३), सचिन रामचंद्र खंडागळे (संगेवाडी, ता. सांगोला, ४८), सागर शरद भिसे (सातारा, १९), सिताराम विठ्ठल रणदिवे (तुगंत,२५), सिद्धेश्वर ईराण्णा होनराव (कुंभारी, जि. सोलापूर, ४१), सुनील श्रीपती संकपाळ (शेडशाळ, १२४), संजय भिकाशी मागाडे (राजेंद्रनगर कोल्हापूर, १०), अॅड. संतोष गणपत कमाने (गोपूज, ता. खटाव, ६८), श्रीकांत कालिदास चव्हाण (सुस्ते, तां. पंढरपूर, ७२),हेमंत विजय जगताप (वानवडी पुणे, ३८)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments