Wednesday, January 15, 2025
Home ताज्या Neuropathology of brain tumors with Radiologic correlates "पुस्तकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद" ...

Neuropathology of brain tumors with Radiologic correlates “पुस्तकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद” कोल्हापूरच्या लेखिका डॉ. मेघना चौगुले यांचे महत्वपूर्ण संशोधन

Neuropathology of brain tumors with Radiologic correlates “पुस्तकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद”

कोल्हापूरच्या लेखिका डॉ. मेघना चौगुले यांचे महत्वपूर्ण संशोधन

कोल्हापूर/प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक अमुलाग्र बदल होत असून यात कोल्हापूरचे संशोधन आणि योगदान आंतरराष्ट्रीय पातळीवर ठळकपणे दिसून आले आहे न्यूरोपँथॉलॉजि (मेंदूविकार गाठी)मध्ये कोल्हापूरच्या न्यू शाहूपुरी येथील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. मेघना चौगुले यांनी महत्वपूर्ण संशोधन करून लिहिलेल्या “Neuropathology of brain tumors with Radiologic correlates” या पुस्तकाची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्प्रिंगर प्रकाशना मार्फत या पुस्तकाचे जर्मनी येथे प्रकाशन झाले आहे या पुस्तकात मेंदूच्या गाठीच्या १२८ प्रकार व उपप्रकारांच्या नऊशे उत्कृष्ट प्रतिमा आहेत त्यामध्ये रुग्णाला त्या गाठी मुळे होणारा त्रास व लक्षणे एम.आर.आय ऑपरेशन चालू असताना ची चाचणी व
त्या रुग्णाच्या प्रोग्नोसिसचा समावेश आहे. त्याच्या टप्याटप्प्यातील निदानाबद्दल विस्तृतपणे माहिती या पुस्तकात दिलेली आहे ज्यामुळे गाठीचा प्रकार व उपप्रकार त्याची ग्रेड समजून पुढील उपचारांची दिशा ठरवता येते अशी माहिती डॉक्टर मेघना चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उपचाराची दिशा अचूक व त्याचे अचूक प्रकारे निदान कसे करायचे याची मांडणी या पुस्तकात केली आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणानुसार वर्गीकरण केलेल्या सर्व गाठींचा यामध्ये समावेश आहे या पुस्तकात समाविष्ट केलेल्या सर्व गाठींचा तपासण्या कोल्हापूर येथील शांती पॅथॉलॉजी लॅबोरेटरी मध्ये झालेल्या आहेत या पुस्तकाचा लाभ विकृती शास्त्र क्ष-किरण शास्त्र व मज्जासंस्था शास्त्राचे विद्यार्थी पदवीधर व तज्ञ डॉक्टरांना होत आहे व होणार आहे अशी माहिती डॉक्टर मेघना चौगुले यांनी यावेळी दिली. शरीराचा राजा मेंदू विशिष्ट प्रकारच्या पेशींनी बनलेले असते त्याचे नियंत्रण सर्व शरीरावर ते मेंदूच्या व मज्जातंतूच्या गाठीचे महत्त्वाचे दोन प्रकार असतात त्यामध्ये साधी गाठ व कर्करोग कॅन्सरची गाठ पुरुषांमध्ये याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असते ते साधारण जागतिक पातळीवर एक लाख पुरुषांपैकी चार या प्रमाणात आहे स्त्रियांमध्ये साध्या प्रकारच्या गाठी जास्त प्रमाणात आढळतात मेंदूच्या गाठीच्या रुग्णांमध्ये डोकेदुखी चक्कर येणे स्मृतिभ्रंश व असंबंध बोलणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात काहीवेळा इन्फेक्शन सुद्धा गाठी सारखे दिसू शकते हे इन्फेक्शन सूक्ष्मजंतू बुरशी विषाणूमुळे होऊ शकते.
या आजारांमध्ये ताप येणे उलटी येणे व मान न हलविता येणे आदी लक्षणे प्रकर्षाने दिसून येतात तसेच एम. आर. आय.वर सुद्धा demyelinating व autoimmune आजारहीगाठी सारखे दिसू शकतात. मेंदू हा कवटीच्या आत असल्याने त्याची इतर अवयवाप्रमाणे वारंवार बायप्सी करणे शक्य नसते ऑपरेशन करतेवेळी जर सर्जनला त्या गाठीच्या प्रकाराबद्दल माहिती मिळाली तर त्याचा रुग्णाला फायदा होतो तेथे intraoperative cytology किंवा forzen याची महत्त्वाची भूमिका आहे. आता ते कोल्हापूर मध्ये शांती पॅथॉलॉजी लॅबोरेटरी मध्ये उपलब्ध आहे. गाठ काढल्यावर त्याचे सर्वप्रथम histopathology वर बरेचदा गाठीचे निदान होते पण काही वेळा गाठीचा प्रकार किंवा ग्रेड histopathology तपासनद्वारे अचूक सांगता येत नाही.अशा वेळी त्याची immunohistochemistry ही तपासणी अनिवार्य ठरते.Mib1 index या तपासणीने आपल्याला गाठी परत होण्याची शक्यता व रुग्णाचे पुढील आयुष्यमान कळू शकते. असेही डॉक्टर चौगुले यांनी सांगितले.
पूर्वी पेशंटला तपासणी करण्यासाठी मुंबई बेंगलोरला जावे लागत असे तसेच त्याचा रिपोर्ट येण्यासाठी १२ ते १५ दिवस लागत असत पण आता ही तपासणी कोल्हापूरमध्ये केल्यामुळे दोन-तीन दिवसात रिपोर्ट तयार होतो महाराष्ट्राच्या विविध भागातून शांती लॅबमध्ये तपासणीसाठी व सेकंड ओपिनियन साठी रिपोर्ट येतात त्यासाठी स्वतः पेशंटला आणायची गरज नसते त्याचे एमआरआय रिपोर्ट क्लीनिकल हिस्टरी काचेच्या पट्ट्या व ब्लॉक कुरियर ने पाठवून दिले जाते अशा प्रकारे १५ वर्षाच्या प्रॅक्टिस मधील यांमध्ये निदान केले गेलेल्या सर्व ब्रेन ट्यूमर पासून हे पुस्तक तयार झाले असल्याचे चौगुले यांनी यावेळी सांगितले.
या पुस्तकामुळे रुग्णांवर उपचार करण्यास मोठी मदत होणार असून पुस्तकाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्राचा संपूर्ण जगभर बहुमान होणार आहे या पुस्तकाचा फायदा रुग्णाच्या त्वरित व अचूक निदान व उपचारासाठी होऊन त्याचे जीवन सुलभ होणार आहे डॉक्टर मेघना चौगुले पॅथॉलॉजी या विषयात शिवाजी विद्यापीठांमधून सुवर्णपदक उत्तीर्ण झाले आहेत पंधरा वर्षापासून त्या कोल्हापूर मधील शांती पॅथॉलॉजी लॅब मध्ये म्हणून कार्यरत आहेत त्यांनी डॉक्टर डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांनी मेंदूचा कर्करोग यासंबंधी बेंगलोर मेमोरियल हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे जागतिक स्तरावरील प्रबंध यामध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. डॉक्टर मेघना चौगुले या न्यूरो पॅथॉलॉजी सोसायटी ऑफ इंडिया आणि इंडियन असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजी च्या सदस्य आहेत.यावेळी पत्रकार परिषदेला डॉ. संदीप पाटील, डॉ.विनय चौगुले, डॉ. शांतीकुमार चिवटे,डॉ. प्रमोद पुरोहित आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments