Tuesday, January 21, 2025
Home ताज्या साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ''नॅक"कडून मानांकन

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ”नॅक”कडून मानांकन

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ”नॅक”कडून मानांकन

-डॉ ए.के. गुप्ता यांची माहिती : पहिल्याच प्रयत्नात पाच वर्षासाठी मानांकन

साळोखेनगर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदे’चे (NAAC) प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे.
हे मानांकन पाच वर्षासाठी म्हणजे डिसेंबर २०२९ पर्यंतच्या कालावधीसाठी मिळाले आहे. यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डी. ए.के गुप्ता यांनी दिली.
‘नॅक’ मूल्यांकन समितीने अभ्यासक्रम पद्धत, मूल्यांकन पद्धत, संशोधनात्मक काम ,पायाभूत सुविधा, प्राध्यापकांची संख्या, विविध विषयांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंट सुविधा आदींची माहिती घेतली. समितीने मूल्यांकन करून अखेर पाच वर्षासाठी मानांकन जाहीर केल्याचे कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने यांनी सांगितले
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश माने म्हणाले २०१४ मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने पहिल्याच प्रयत्नात मानांकन मिळवले आहे .या मानांकनामुळे संस्थेच्या शिक्षणाची गुणवत्ता, संशोधन कार्य, पायाभूत सुविधा व विद्यार्थी विकासाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. या यशामध्ये प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी, पालक यांचा मोठा वाटा आहे.संस्थचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेरे कैलासा,तेरे दिवाने या संगीतमय कार्यक्रमाचे आज देवल क्लब येथे आयोजन

मेरे कैलासा,तेरे दिवाने या संगीतमय कार्यक्रमाचे आज देवल क्लब येथे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : आज सोमवार २० जानेवारी २०२५ रोजी, गोविंदराव टेंबे रंगमंदिर,देवल क्लब कोल्हापूर येथे...

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ”नॅक”कडून मानांकन

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ''नॅक"कडून मानांकन -डॉ ए.के. गुप्ता यांची माहिती : पहिल्याच प्रयत्नात पाच वर्षासाठी मानांकन साळोखेनगर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या...

मेरीट स्कॉलरशिप’ मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील

‘मेरीट स्कॉलरशिप’ मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील -डी. वाय. पाटील ग्रुपमधील १८८ विद्यार्थ्यांना ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ प्रदान कोल्हापूर/प्रतिनिधी : सौ...

Recent Comments