जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन
कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे आज १५ डिसेंबर, २०२४ रोजी सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका येथे निधन झाले आहे.उस्ताद झाकीर हुसेन हे एक भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक होते. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ ह्यांचे सर्वात मोठे पुत्र होते.त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.त्यांना १९८८ साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले होते.
हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथेदेखील शिक्षण घेतले.
त्यांच्या वडिलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.
हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली.
झाकीर हुसेन यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.हुसेन यांना दोन भाऊ आहेत यातील उस्ताद तौफिक कुरेशी हे तालवाद्यवादक आहेत आणि उस्ताद फझल कुरेशी हे तबला वादक आहेत