श्री स्वामी समर्थ दत्त भक्त मंडळ, नेहरु नगरतर्फे दत्त जयंती निम्मित पार पडले विविध धार्मिक कार्यक्रम
श्री दत्ताची श्री गुरुचरित्र रुपात बांधण्यात आली होती पूजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ दत्त भक्त मंडळ, नेहरु नगरतर्फे दत्त जयंतीनिमित्त ८ ते १४ डिसेंबर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आज श्री.दत्त जयंती निम्मित श्री. दत्ताची श्री गुरुचरित्र रुपात पूजा बांधण्यात आली होती. श्री दत्त जयंती उत्सव २०२४ अंतर्गत
भजन,स्वरतरंग प्रस्तुत, रंग भक्तीचे, संदिप लोहार यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्तिरंग प्रस्तुत, भावभक्ती गीते श्री हनुमान सोंगी भजनी मंडळ, वडणगे सोंगी भजन सायं. ४ पालखी सोहळा (गणेश मंदिर ते दत्त मंदिर) सायं. ६ श्री दत्त जन्मकाळ सोहळा आणि रात्री ७ वाजता विधायक युवक संघटना तर्फे महाप्रसाद झाला.या उत्सव साठी पुरुषोत्तम कुलकर्णी,गजानन शिंदे,अतुल हसुरकर, किरण रणदिवे,विजय चव्हाण,जयसिंग राऊत,प्रसाद उगवे विधायक संघटनेचे कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.