Wednesday, December 11, 2024
Home ताज्या इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

 

अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF) 2024’ च्या आयडियाज फॉर विकसित भारत ” सायन्स अँड टेक्नॉलॉजी हॅकाथॉन” मध्ये राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवले. इ ८ वीतील विद्यार्थी प्रियांशु गराई, दिगंबर मोहिते, चिराग यरगोप्पा यांनी “द रॉक इनोव्हेटर्स टीम” या नावाने राष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट तयार केला होता. त्यांच्या अभिनव कल्पनेचे शीर्षक होते. “पल्स पायलट: नेक्स्ट-जेन ड्रायव्हर हेल्थ मॉनिटर”, गाडी चालवत असताना झोप लागत असल्यास किंवा मद्यप्राशनाखाली वाहन चालवणाऱ्या चालकांचे जीव वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे प्रोजेक्ट तयार केले होते.
या विद्यार्थ्यांच्या संघाने श्रेणी 1 इयत्ता १२ वीपर्यंतच्या या गटात प्रथम क्रमांक पटकावला व ₹२५,०००/- (पंचवीस हजार रुपये) रोख बक्षीस मिळवले. या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला भारतातील प्रमुख तज्ज्ञांचे विशेष कौतुक लाभले. इस्रोचे अध्यक्ष श्री. एस. सोमनाथ, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत, सीएसआयआर-एनआयआयएसटीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. के. व्ही. रमेश, संचालक डॉ. सी. आनंदरामकृष्णन, तसेच एएसटीईसी असमचे संचालक डॉ. जयदीप बरुआ यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले.या विद्यार्थ्यांना श्री. हर्षित सुकडेवे, डॉ. साबीर हुसेन, सौ. बीना इनामदार, उपप्राचार्या सौ. शोभा नवीन व प्राचार्य डॉ. नवीन एच. एम. यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थापक-अध्यक्ष श्री. संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाचे जोरदार कौतुक केले. विश्वस्त श्री. विनायक भोसले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर संचालिका सस्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे राष्ट्रीय स्तरावर यश मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी   दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या...

Recent Comments