Thursday, November 21, 2024
Home ताज्या कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारणार : राजेश क्षीरसागर

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारणार : राजेश क्षीरसागर

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारणार : राजेश क्षीरसागर

राजारामपुरी येथे कोपरा सभेचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहर हे कला, क्रीडा आणि कुस्तीपंढरी म्हणून तसेच “फुटबॉल पंढरी” ही म्हणून ओळखले जाते. आपल्या शहरातील फुटबॉल खेळाला सुमारे १०० पेक्षा अधिक वर्षांची मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे फुटबॉल खेळला जातं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक फुटबॉल संघ शहरात आहेत. येथील फुटबॉल खेळाडू आणि खेळाच्या विकासासाठी आगामी काळात कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारली जाईल, असे प्रतिपादन कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर केले.राजारामपुरी येथे आयोजित फुटबॉल प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमीसाठी सरकारकडे यापूर्वीच प्रस्ताव सादर करण्यात आला असून यासाठी शेंडा पार्क येथे जागेची मागणीही करण्यात आली आहे. कोल्हापुरात फुटबॉलचा देशात कोलकत्ता नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रेक्षक वर्ग आहे. परंतु, सुसज्ज मैदान, तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि फुटबॉलसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने कोल्हापूरसह आसपासच्या भागातील फुटबॉल खेळाडूंच्या प्रशिक्षणावर आणि खेळावर मर्यादा येत आहेत. यामुळे अनेक फुटबॉलपटू स्थानिक संघापुरते मर्यादित राहिले आहेत. काही खेळाडू पुणे, मुंबई, गोवा, कलकत्ता आदी ठिकाणच्या नामांकित क्लबकडून खेळतात. बाहेर जाणार्‍या खेळाडूंना कोल्हापुरातच सुसज्ज मैदान आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण प्राप्त होण्यासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू घडावेत यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. कोल्हापुरात फुटबॉल अकॅडमी उभारण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे. याबाबत मी सातत्याने ते सरकारकडे पाठपुरावा करत असून लवकरच या प्रयत्नांना यश येईल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
राजेश क्षीरसागर यांच्यातर्फे दरवर्षी “राजेश चषक फुटबॉल स्पर्धे”चे आयोजन करून खेळाडूंना भरघोस बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात येते. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत श्री रावणेश्वर मंदिर ते टेंबे रोडपर्यंत फुटबॉल स्ट्रीट विकसित झाला असून या कामासाठी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कोल्हापुरात आंतराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभी रहावी यासाठी महायतीचे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी धनुष्यबाण चिन्हा समोरील बटण दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केले.

काँग्रेस नगरसेवकांची कुंडली असा अनावधानाने उल्लेख – फरास

पापाची तिकटी येथील सभेतील माझ्या भाषणात काँग्रेस नगरसेवकांची कुंडली माझ्याकडे आहे, असा उल्लेख असा अनावधानाने झाला आहे, असे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व माजी स्थायी समिती सभापती आदील फरास यांनी पत्रकात म्हटले आहे. वास्तविक महाविकास आघाडी काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर यांची महापालिकेत नगरसेवक असतानाची संपूर्ण कुंडली माझ्याकडे आहे, असा तो उल्लेख आहे. स्वतःला गरीब म्हणून प्रचार करणारे लाटकर ४० ते ५० लाखांच्या गाडीतून फिरतात. शिवाजी पार्कात त्यांचा लॅव्हीश फ्लॅट आहे. सर्वसामान्य म्हणून सांगणाऱ्या लाटकर यांच्या कुटुंबाची संपत्ती साडेतीन कोटी कशी? हा खरा प्रश्न आहे. महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी नेता होऊ पाहणार्या महाविकास आघाडी पुरस्कृत या उमेदवाराने स्वतःचा चेहरा आरशामध्ये पहावा. लाटकर यांनी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यावर खोटे आणि बिनबुडाचे आरोप करू नयेत. अन्यथा यापुढे त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही फरास यांनी दिला आहे.या प्रचारसभेला शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, भाजप सचिव महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, सत्यजित कदम, संदीप कवाळे, मुरलीधर जाधव, दुर्गेश लिंग्रस, रेखा आवळे, रूपराणी निकम, गीता भंडारी, अभिजित शिंदे, दीपक चव्हाण, बापू जाधव, दीपक जाधव, मंदार तपकिरे, कमलाकर किलकिले, जयराज निंबाळकर, राहुल चिकोडे, अमित पसारे, अंकुश निपाणीकर, धैर्यशील साळोखे, धनराज कणसे, अक्षय पाटील, योगेश मोहिते, अमर निंबाळकर, आसिफ मुल्लाणी, विघ्नेश आरते, शशी चौगुले, बाळासाहेब शेलार, करण जाधव, विश्वास जाधव, अजिंक्य पाटील, जयराज जाधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments