Monday, December 2, 2024
Home ताज्या विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुया : जगदीश चौगले

विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुया : जगदीश चौगले

विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुया : जगदीश चौगले

कोल्हापूर/प्रतिनिधी : आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करुया, असे आवाहन निगवे खालसा (ता.करवीर) येथील हनुमान दुध संस्थेचे अध्यक्ष जगदीश चौगले यांनी केले. चौगले यांच्यासह युवराज पाटील, शंकर चौगुले, बाबुराव पाटील, बाबुराव बाचणकर, ग्रामपंचायत सदस्य आनंदा मडीलगेकर, रविंद्र महाडेश्वर, बाजीराव गोंगाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आ.सतेज पाटील, आ.ऋतुराज पाटील, गोकुळ संचालक डॉ.चेतन नरके यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आ.सतेज पाटील म्हणाले, चौगले यांच्या या निर्णयाचा आनंद आहे. सर्वसामान्यांना आपला वाटणारा आमदार म्हणून ऋतुराज पाटील यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाला पाठबळ देण्याची तुमची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. आ.ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा.आ.ऋतुराज पाटील म्हणाले, गावच्या सर्वांगीण विकासासाठी गाव एकसंघ राहणे महत्वाचे आहे. ही भूमिका घेऊन चौगले यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करुन आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. या निर्णयामुळे मला विधानसभेच्या विजयासाठी मोठे बळ मिळाले आहे.गोकुळ संचालक डॉ.चेतन नरके म्हणाले, आ.ऋतुराज पाटील यांनी सर्वांना सोबत घेऊन गेल्या पाच वर्षात धडाडीने काम केले आहे. दक्षिणची जनता त्यांच्या पाठीशी असल्याने ते नक्की बाजी मारतील.
यावेळी गोकुळ संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, बिद्री कारखाना संचालक आर. एस. कांबळे, माजी संचालक श्रीपती पाटील, एस. बी. पाटील, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर, जि. प. चे माजी सदस्य एकनाथ पाटील, सागर पाटील, एल. एस. किल्लेदार, पी. एम. पाटील, अशोक किल्लेदार यांच्यासह निगवे खालसामधील कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments