Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याखासदार स्वतःच्याच घरात झोपतात , कुणाच्या नादाला लागलेले नाहीत , त्यांचा संसार...

खासदार स्वतःच्याच घरात झोपतात , कुणाच्या नादाला लागलेले नाहीत , त्यांचा संसार टिकून; राजेखान जमादार

खासदार स्वतःच्याच घरात झोपतात , कुणाच्या नादाला लागलेले नाहीत , त्यांचा संसार टिकून;
राजेखान जमादार

चंदगडच्या मेळाव्यात सतेज पाटील यांच्यावर घणाघती टीका

चंदगड/प्रतिनिधी : खासदार संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असल्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा तोल सुटला आहे. त्यांच्या तोंडातून गटारगंगा वाहू लागली आहे. त्यांना माहित असावे की, खासदार संजय मंडलिक स्वतःच्याच घरात झोपतात. त्यांचा संसार टिकून आहे. अशी बोचरी टीका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केली आहे.
चंदगड येथील महायुतीच्या मेळाव्यात जमादार बोलत होते.
जिल्हा उपसंघटक डॉ. नामदेव निट्टुरकर व उपतालुकाप्रमुख सौ.सुजाता कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.
जमादार म्हणाले,”काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचार सभांत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी प्रचाराची पातळी सोडली आहे. काँग्रेस उमेदवाराचा पराभव नजरेपुढे दिसू लागल्याने ते सैरभैर झाले आहेत. त्यातूनच संजय मंडलिक यांच्यावर पातळी सोडून टीका करू लागले आहेत. आता त्यांच्या झोपण्यावरही टिका सुरू आहे. याकडे लक्ष वेधत राजेखान जमादार म्हणाले, “आमचे खासदार स्वतःच्याच घरात झोपतात. कधी कुणा नटीच्या नादाला लागलेले नाहीत. म्हणून त्यांचा संसार टिकून राहिलेला आहे. अनेक निवडणुकात खासदार संजय मंडलिक यांचा पाठिंबा सतेज पाटील घेतला. त्यामुळे त्यांना विविध संस्थात यश मिळाले आहे. यशाचे सगळे श्रेय लाटण्यात सतेज पाटील माहीर आहेत. मंडलिकांचा पाठिंबा घेवून मिळालेल्या विजयाचा गुलाल आपल्या अंगावर टाकून घेण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. अनेक निवडणूकातील विजयात संजय मंडलिक यांचा खारीचा वाटा आहे. एवढीही कृतज्ञता सतेज पाटील यांच्याकडे नाही.”
जिल्हाध्यक्ष जमादार म्हणाले,”
गृहराज्यमंत्री असताना २०१४ साली विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणूकीत अमल महाडीक यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराने त्यांना पराभव केला. त्यानंतर ते इतके कपटीकारस्थान, पाताळयंत्री , मायावी बोलणारे आणि विश्वास घातकी झाले आहेत की, जनतेतून निवडणूक लढवण्याचे धाडस त्यांच्यात उरलेले नाही. म्हणून पाठीमागच्या दाराने विधान परिषदेवर निवडून गेले.”
यावेळी यशोवर्धन मंडलिक, उपजिल्हा प्रमुख बाबू नेसरकर,युवा सेना तालुका प्रमुख गजानन गावडे , वाहतूक सेना तालुका प्रमुख सलीम मुल्ला,शिव उद्योग सेना तालुका प्रमुख सुशांत नौकुडकर, शिवसेना चंदगड तालुका सचिव अविनाश पाटील,उपतालुकाप्रमुख नामदेव सावंत, युवा सेना उपतालुकाप्रमुख कैलास बोकडे,मनोहर पाटील, विभाग प्रमुख अनिल गावडे, केदारी निवगीरे, यल्लापा पाटील, संभाजी पाटील,बाळू कडोलकर,पप्पु गावडे, श्रीकांत सुभेदार उपस्थित होते.

चौकट :
महाराजांच्या राजकिय बळी चे पातक …

काँग्रेस हाय कमांडने कोल्हापूरची उमेदवारी सतेज पाटील यांनाच दिली होती. पण आपण जनतेतून निवडून येणार नाही हे पक्के माहित असलेल्या सतेज पाटलांनी उमेदवारीची माळ ७७ वर्षाच्या शाहू महाराजांच्या गळ्यात घालून महाराजांचा राजकीय बळी देण्याचे पातक केले आहे.
अशी टीका राजेखान जमादार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments