Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्याकैलासगडची स्वारी मंदिराच्या६४वा वर्धापनदिन सोहळानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

कैलासगडची स्वारी मंदिराच्या६४वा वर्धापनदिन सोहळानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

कैलासगडची स्वारी मंदिराच्या६४वा वर्धापनदिन सोहळानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

अध्यक्ष बबेराव जाधव, उपाध्यक्ष सत्यजीत जाधव यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : मंगळवार पेठ, खासबाग येथील कैलासगडची स्वारी मंदिराच्या ६४ व्या वर्धापनदिन सोहळानिमित्त सोमवार दिनांक १७/३/२०२४ ते सोमवार दिनांक २५/३/२०२४ या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष बबेराव जाधव, उपाध्यक्ष व युवा उद्योजक सत्यजीत चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कैलासगडची स्वारी मंदिराच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन आणि कलायोगी जी. कांबळे सार्वजनिक आर्ट गॅलरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व हळदी-कुंकू समारंभ आयोजित करणेत आले आहे.
या उत्सव अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवार दि. १७ मार्च रोजी हुतात्मा पार्क येथे चित्रकला स्पर्धा सकाळी ८ ते ११ वा या कालावधीत आयोजित केली आहे. रविवारी दि. २४/३/२०२४ रोजी रात्री १०.०० वाजता शिवालय भजनी मंडळ यांचे भजन व रात्री ठिक १२.०० वा. शिवास महारुद्राभिषेक धार्मिक विधीने घालणेत येणार आहे. सोमवार दिनांक २५/३/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री सत्यनारायण पुजा व सायंकाळी ५.०० वाजता मर्दानी खेळ व सायंकाळी ६.०० वा. पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. पालखी सोहळ्या प्रसंगी पालखीचे पूजन माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर पालखी सोहळ्याचे उद्घाटन मंदिराचे अध्यक्ष बबेराव शंकरराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. शिवालय भजनी मंडळ यांचे भजन, धनगरी ढोल, झांजपथकाच्या गजरात पालखी सोहळा असून, पालखी समोर भव्य आतिषबाजी करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता मंदिराचे अध्यक्ष मा. बबेराव शंकरराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटीलसो यांच्या हस्ते व मंदिराच्या विश्वस्त आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष व युवा उद्योजक सत्यजीत चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसाद वितरण सोहळा होणार आहे. स्वारींच्या आशिर्वादाने सर्व विश्वस्त व भागातील सर्व महिला व भक्तांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी विश्वस्त मंडळातील महादेव महाराज यादव, विलास गौड, शिवाजी जाधव, उदय कारंजकर, अशोक कांबळे, बबन कांबळे, दीपक जाधव, किशोर भोसले, विठ्ठल जाधव, गणेश भोसले, अरुण आवटे, संतोष मोरे, अजय भोसले, रोहीत कारंडे, अजित जाधव, राजू जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments