के एम चषकावर नाव शिवाजी तरुण मंडळाचे
कोल्हापूर/प्रतिनिधी : खंडोबा तालीम मंडळ आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या के एम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेतील अत्यंत सामना शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम संघात झाला. अत्यंत चुरशीने पार पडलेल्या या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने खंडोबा तालमीवर २-१ गोलन विजय मिळवत के एम चषकावर नाव कोरले. विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते रोख २ लाख रुपये आणि केएम चषक, तर उपविजेत्या खंडोबा तालमीला एक लाख आणि चषक तसेच बालगोपाल आणि सम्राट नगर संघांना प्रत्येकी २५ हजारांच बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथल्या खंडोबा तालीमिला यंदा १११ वर्ष होत आहेत याचे औचित्य साधून, तसेच युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून छत्रपती शाहू स्टेडियमवर के. एम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा नॉकआऊट पद्धतीने झाली. त्यामुळ सर्वच सामने अत्यंत चुरशीन खेळले गेले. आज अंतिम सामन्यात बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि तुल्यबळ खंडोबा तालीम मंडळ या संघात सामना खेळण्यात आला हा हाय होल्टेज सामना असल्याने कोल्हापुरातील दर्दी फुटबॉल शौकिनांनी मैदानात गर्दी केली होती. ४० हजाराच्या संख्येने फुटबॉल शौकिनांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. सामन्यापूर्वी श्रीमंत शाहू छत्रपती यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. समरजीत सिंह राजे घाटगे, चंदगडचे आमदार राजेश पाटील, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक चॅनेलबीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, खंडोबा तालमीचे अध्यक्ष युवराज बचाटे, शिवाजी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत किक ऑफन सामन्याच उद्घाटन झाले खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते टॉस झाला त्यांचा सामन्याला प्रारंभ झाला सुरुवातीपासूनच दोन्ही संघाकडून लयबद्ध चढाया झाल्या. दरम्यान सामन्याच्या पहिल्या काही मिनिटातच शिवाजी तरुण मंडळाच्या योगेश कदमन पहिल्या गोलची नोंद करत संघाला आघाडी मिळवून दिली. यामुळ फुटबॉल शौकिनांनी जल्लोष केला. त्याच्या पुढच्याच मिनिटाला राज अली यान वेगवान खेळाच प्रदर्शन करत बचाव फळी भेदून गोल साठी चढाई केली. मात्र चेंडू गोल पोष्टला चाटून गेल्यान संधी दवडली गेली. दरम्यान खंडोबाच्या केवल कांबळेच्या पासवर सुधीर कोटीकोलाला गोलसाठी मिळालेली संधी दवडली गेली. यानंतर शिवाजी तरुण मंडळाकडून आक्रमण वाढली त्यांच्या करण चव्हाण बंदरेन मारलेला फटका देखील गोल पोस्टला लागून मैदाना बाहेर गेला. पुर्वार्धात शिवाजी मंडळांन १- ० आघाडी घेतली होती. उत्तरार्धात या गोष्टी परतफेड करण्यासाठी खंडोबा कडून शर्तीचे प्रयत्न झाले पण त्यांच्या चढाया शिवाजीच्या बचाव फळीन परतावून लावल्या दरम्यान करण चव्हाण बंदरेन खंडोबाची बचाव फळी भेदत दुसऱ्या गोलची नोंद केली या गोल मुळ शिवाजी मंडळाच्या पाठीराख्यांनी स्टेडियम मध्ये जल्लोष केला त्यानंतर मात्र खंडोबा संघान आपल्या चाली बदलत नियोजनबद्ध चढाया सुरू केल्या परिणामी सामना संपल्यास ५ मिनिट अवधी असताना मिळालेल्या संधीचं सोनं करत प्रतीक सावंतनं मैदानी गोल नोंदवत संघावरील आघाडी १-२ अशी कमी केली. त्यानंतर देखील मिळालेल्या संधीचे त्यांना गोल मध्ये रूपांतर करता आलं नाही परिणामी बलाढ्य शिवाजी तरुण मंडळांन २-१ अशा गोल फरकाने हा सामना जिंकला विजयानंतर फुटबॉल शौकीन आणि शिवाजी तरुण मंडळाच्या समर्थकांनी मैदानात जल्लोष केला खेळाडूंनीही मैदानात फेरी मारून फुटबॉल प्रेमींच आभार व्यक्त केलं. तत्पूर्वी मध्यंतराला शकुंतला महाडिक, ग्रीष्मा महाडिक, वैष्णवी महाडिक, कृष्णा महाडिक, रेश्मा महाडिक, गायत्री देवी कुपेकर, संध्या महाडिक, हर्षदा महाडिक यांच्या हस्ते रिया गोयल, सोहा पठाण, दर्शनी ढाले, भक्ती बिरंगळी, अश्विनी कालेकर या भाग्यवान महिला प्रेक्षकांना पैठणी भेट दिली. खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशान युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी चषकाचे आयोजन केले. या निमित्तान देश पातळीवरचे खेळाडू घडतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. तसंच या स्पर्धेत भरघोस बक्षीस दिल्याचा आनंद होत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 25 कोटी निधी खेचून आणल्याबद्दल त्यांनी कृष्णराज महाडिक यांच्या पाठपुराव्या बद्दल कौतुक केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पाठपुराव्याला पाठबळ दिल्याच देखील त्यांनी सांगितलं. श्रीमंत शाहू महाराज, मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमा राजे छत्रपती तसच केएसएन पाठबळ दिल्यामुळच आपण या स्पर्धा घेऊ शकलो. अशाच पद्धतीन आपण विविध स्पर्धांच आयोजन करणार असून, येत्या तीन ते चार वर्षात आपल्या कोल्हापूरची खेळाडू जागतिक पातळीवर गेलेले दिसून येतील, असा विश्वास युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला. गेले सहा महिने पाठपुरवा केल्यामुळ आपण २५ कोटींचा निधी कोल्हापूरच्या विकासासाठी आणू शकलो, याच समाधान असल्याच त्यांनी सांगितलं. खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी यापुढही अशाच पद्धतीन प्रयत्न राहतील असा विश्वास त्यांनी छत्रपती शाहू स्टेडियमवरील उपस्थित क्रीडा शौकिनांना दिला. दरम्यान के एम चषक फुटबॉल स्पर्धेतील सर्वच सामन्यांच आपल्या विशिष्ट पद्धतीने निवेदन करणारे फुटबॉल शौकिनांचे आवडते निवेदक विजय साळुंखे यांना चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्याकडून १० हजार रुपये देण्यात आले. दरम्यान माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रोख दहा हजार आणि ४२ इंची टीव्ही देऊन असेंद्र दत्ताला बेस्ट गोल रक्षकाच्या बहुमानाने तर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते खंडोबाच्या आदित्य लायकरला बेस्ट डिफेंडरचा बहुमान रोख १० हजार आणि ४२ इंची टीव्ही देऊन खंडोबा तालमीच्या कुणाल दळवीला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते बेस्ट हाफचा बहुमान रोख दहा हजार आणि ४२ इंची टीव्ही देऊन गौरव करण्यात आला. तर बेस्ट फॉरवर्ड चा बहुमत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण चव्हाण बंदरे याला रोख १० हजार आणि ४२ इंची टीव्ही देऊन गौरवण्यात आले. संपूर्ण स्पर्धेतील मालिका बहुमान शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू योगेश कदम याला श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेतील विजेता ठरलेल्या शिवाजी तरुण मंडळाच्या संघाला रोख दोन लाख रुपये आणि के एम चषक तर उपविजेत्या खंडोबा तालीम मंडळाला रोख एक लाख रुपये आणि चषक देऊन श्रीमंत शाहू महाराज मालोजीराजे छत्रपती पालकमंत्री हसन मुश्रीफ नामदार चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते गौरवण्यात आले.तर तृतीय विजेता ठरलेल्या बालगोपाल तालीम मंडळ आणि सम्राट नगर संघाला प्रत्येकी २५ हजार रुपये देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.