संजय घोडावत पॉलिटेक्निक मध्ये “जागतिक महिला दिन” उत्साहात साजरा
जयसिंगपूर/प्रतिनिधी : संजय घोडावत पॉलिटेक्निक मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून करवीर भुयेवाडी येथील यशदा मार्गदर्शक ,व्याख्यात्या राणी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी बोलताना त्यांनी महिला सशक्तिकरण,सर्वांगीण विकास, नेतृत्व, आई-वडिलांचे संस्कार याबद्दलचे महत्त्व सांगितले. त्या म्हणाल्या की भारताच्या सक्षम महिला नागरिक म्हणून आपल्याला उभे राहायचे आहे. देशाचे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती आपल्या हातामध्ये आहे.त्यासाठी उत्तम शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य विराट गिरी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जगातील यशस्वी महिलांच्या कार्याचा त्यांनी उल्लेख करत त्यांच्या कार्यास उजाळा दिला. ज्येष्ठ महिला धावपटू लता करे यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी सांगून सर्वांना प्रेरित केले.प्रा. सुभांगी महाडिक यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन श्रुती काळे आणि राधिका पोरवाल यांनी केले तर प्रा. रईसा मुल्ला यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.