Monday, November 11, 2024
Home ताज्या राज्यातील एस टी कर्मचाऱ्याचा प्रश्न मार्गी लावा - आमदार सतेज पाटील यांची...

राज्यातील एस टी कर्मचाऱ्याचा प्रश्न मार्गी लावा – आमदार सतेज पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

राज्यातील एस टी कर्मचाऱ्याचा प्रश्न मार्गी लावा – आमदार सतेज पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यमार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व उपदानाकरीता निधी उपलब्ध करून देऊ तसेच कामगार करार थकीत रक्कम लवकरच जमा करून प्रश्न सोडवला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नांवर विधानपरिषदेत उत्तर दिले
राज्यमार्ग परिवहन महामंडळास शासनाकडून गत ५ महिन्यांपासून अपुरा निधी मिळत असल्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेला रकमेचा हिस्सा रुपये ६५० कोटी भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही ट्रस्टकडे जमा झाले नसल्याचे २ जानेवारी, २०२३ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,असल्यास राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व उपदानाच्या रक्कमा ट्रस्टकडे भरण्यात आले नसल्याकारणामुळे सदरहू ट्रस्टला त्यापोटी मिळणारे व्याज रुपये १२ ते १५ कोटी मिळाले नसून ट्रस्ट अडचणीत आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,असल्यास, राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतून मागील दोन वर्षात सेवानिवृत्त झालेल्या ९९०४ कर्मचाऱ्यांची रुपये १७५ कोटी इतकी थकबाकी प्रलंबित असून त्यापैकी किती थकबाकीची रक्कम अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आली आहे, तसेच अप्पर केंद्रीय भविष्य निर्वाह निधी भवन बांद्रा, मुंबई यांचे कार्यालयात ऑफलाईन दावे स्वीकारण्यात आलेल्या राज्यमार्ग परिवहन महामंडळातील किती निवृत्त कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ देण्यात आला आहे व किती प्रकरणे प्रलंबित आहेत, असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने राज्यमार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निवार्ह निधी व उपदानाच्या रक्कमा भरण्याबाबत तसेच निधीची तरतूद करून राज्यमार्ग परिवहन महामंडळास पुरेसा निधी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली.
दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून सदर रकमा ट्रस्टकडे भरण्यास विलंब होत असला तरी कर्मचा-यांना मात्र त्यांच्या कपातीवर पूर्ण व्याज देण्यात येत आहे. सदर व्याजाची प्रतिपूर्ती राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळामधून मागील दोन वर्षात ७९३७ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी यांची माहे डिसेंबर २०२२ अखेर रजा रोखीकरण १२२.८४ कोटी तसेच कामगार करार थकीत रक्कम रुपये २५.५७ कोटी अशी एकूण रुपये १४८.४१ कोटी रक्कम प्रलंबित आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील २ वर्षात रजा रोखीकरणापोटी रुपये ५२.११ कोटी तसेच कामगार करार थकीत रक्कमेपोटी रूपये ५९.०३ कोटी अशी एकूण रुपये १११.१४ कोटी इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. अप्पर केंद्रीय भविष्य निर्वाह निधी भवन वांद्रे, मुंबई येथे राज्य परिवहन महामंडळातील सन २०१७ ते२०२३ पर्यंत एकूण १०६३ दावे सादर करण्यात आलेले असून त्यापैकी ३६६ सेवानिवृत्त कर्मचा-यांना ऑफलाईन पध्दतीने कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ देय करण्यात आलेला आहे. तसेच ४०८ वे निर्वाह निधी कार्यालय वांद्रे येथे प्रलंबित आहेत. तथापि, ९८ कर्मचाऱ्याचे दावे ऑनलाईन पध्दतीने सादर करुन निकाली काढण्यात आलेले आहेत व इतर १९१ कर्मचाऱ्यांच्या दाव्यांबाबत विभागीय स्तरावर कार्यवाही प्रगत असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी

पूरस्थिती, कोरोना काळात लाटकर कुठं होते ? : सत्यजित उर्फ नाना कदम यांची लाटकर यांच्यावर टीका राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी कोल्हापूर/प्रतिनिधी : फिल्मी...

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास जनता जनार्दनासह अबाल वृद्ध व माता-भगिनींचा उठाव मोठा नानीबाई चिखलीत प्रचार सभेला उत्स्फूर्त...

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ कोल्हापूर/प्रतिनिधी : महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर...

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाची कामगिरी अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाने इलाईट टेक्नो ग्रुप, पुणे...

Recent Comments