केआयटीच्या माजी विद्यार्थ्यांना एका प्लॅटफॉर्मवरती एकत्र आणणार: माननीय साजिद हुदली
केआयटीमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : १९८३ सालापासून केआयटी कोल्हापूर येथून असंख्य कुशल अभियंते बाहेर पडलेले आहेत आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यात उत्कृष्ट दर्जाची सेवा पुरवत आहेत या जगभर पसरलेल्या सर्व अभियंत्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती एकत्र आणून सर्वजण एका संपर्कात कसे राहतील व परस्पर सहकार्यातून उत्कर्ष कसे साधतील याची व्यवस्था लवकरच करण्यात येईल असे मत केआयटीचे उपाध्यक्ष व केआयटी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय साजिद हुदली यांनी सांगितले ते कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूरच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी केआयटीचे चेअरमन सन्माननीय सुनील कुलकर्णी होते तर व्यासपीठावर सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. मोहन वणरोट्टी , कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जींनी, माजी विद्यार्थी कोल्हापूर विभागाचे सचिन पाटील, दिल्ली विभागाचे आयुष कौशिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनानंतर हा स्नेहमेळावा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्ठ्या प्रमाणावर घेण्यात आला. देशभरातून जवळपास १००० विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला नोंदणी केली व ६०० विद्यार्थी प्रत्यक्ष आले तर १५०० विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम ऑनलाईन पहिला. माजी विद्यार्थ्यांनी केआयटीचा परिसर यादिवशी सकाळपासून गजबजून गेला होता. यादिवशी विद्यार्थ्यांनी आपापल्या विभागांना भेटी दिल्या, आपल्या प्राध्यापकांच्या भेटी घेतल्या, आयडिया लॅब पाहून महाविद्यालयाच्या प्रगतीचे कौतुक केले. आणि त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांच्या साठी ओपन एअर थेटर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सदर कार्यक्रमांमध्ये संचालक डॉ. मोहन वणरोट्टी यांनी केआयटीचा आजपर्यंतचा ४० वर्षाचा प्रवास माजी विद्यार्थ्यांच्या समोर मांडला. यावेळी कार्यकारी संचालक डॉक्टर विलास कार्जींनी यांनी केआयटीची पुढील ध्येय धोरणे स्पष्ट केली. साजिद होती यांनी या मेळाव्याचा उद्देश सांगून सर्व ॲल्युमिनिना एकत्र राहून काम करण्याच्या आणि परस्पर सहकार्याची भावना वाढविण्याचे आवाहन केले यावेळी सचिन पाटील व आयुष कौशिकी यांच्याबरोबर माजी विद्यार्थ्यांची मनोगते व्यक्त करून केआयटीसाठी आपण सदैव तत्पर आणि मदतीसाठी तयार असल्याचे सांगितले. याच कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेल्या काही प्राध्यापक मंडळींचे सत्कार करण्यात आले. सचिव दीपक चौगुले यांनी आपल्या मनोगतामध्ये केआयटी चे माजी विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत केआयटीचा अभिमान आणि मान उंचावत आहेत याचा अभिमान असल्याचे मनोगत व्यक्त केले. चेअरमन सुनील कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी मेळाव्याचे समन्वयक डॉक्टर सुनील कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद पाटील यांनी केले.