महालक्ष्मी महोत्सवात दिव्य मंत्र साधना गुरुदेवांच्या सहवासात भाविक भक्तिरसात रंगून गेले
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री पार्श्वपद्मावती शक्तिपीठ तीर्थ धाम कृष्णगिरी (तमिळनाडू) आयोजित ८ दिवसीय श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवात यतिवर्य, राष्ट्रसंत, सर्वधर्म दिवाकर, अध्यात्म योगी गुरुदेव पूज्य, डॉ. श्री वसंत.
सध्या सुरू असलेल्या महायज्ञात सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दैवी नामजप सुरू असून यामध्ये २५० पंडित श्रीसूक्त, महालक्ष्मी, माँ पद्मावती, भैरव देव आणि सर्व दैवी देवतांच्या मंत्रांचा उच्चार करत आहेत. गुरुदेव श्री वसंत विजय जी महाराज साहेब यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत अलौकिक १०८ हवन कुंडात हजारो किलो औषधी, सुका मेवा आणि तूप दैवी मंत्रोच्चारांसह ओतण्यात येत आहे. हवन कुंडात टाकला जाणारा यज्ञ आणि करोडो मंत्रांची ऊर्जा जीवनात सौभाग्य आणि समृद्धीची दारे उघडत आहे. २६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या दिव्य महालक्ष्मी उत्सवात देश-विदेशातील २५ राज्यातून मोठ्या संख्येने भाविक कोल्हापुरात दाखल होत असून उत्सवाचा आनंद लुटत आहेत.