संजय घोडावत यांच्यातील नम्रपणा माणूसपणाची साक्ष देतो – प्रसाद ओक,संजय घोडावत यांचा ५८ वा वाढदिवस उत्साहात साजरा
जयसिंगपूर/प्रतिनिधी : संजय घोडावत यांच्यातील नम्रपणा त्यांच्यातील माणूसपणाची साक्ष देतो. माणसातील गोडवा माणसं जोडल्यामुळे वाढतो. माणूस मोठा होण्यासाठी माणसातला जिव्हाळा वाढणं खूप गरजेचे आहे असे गौरव उद्गार संजय घोडावत यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त घोडावत विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात अभिनेता प्रसाद ओक यांनी काढले.
पुढे ते म्हणाले की संजय घोडावत यांचा जीवन प्रवास हा एक चित्रपटाचा विषय आहे.त्यांच्यावर एक बायोपिक निघायला हवे. यावेळी त्यांनी विद्यापीठात अभिनय अभ्यासक्रम सुरू करण्याची विनंती केली. घोडावत विद्यापीठाचा परिसर हा परदेशी विद्यापीठाला लाजवेल असा आहे. यासाठी संजय घोडावत यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाचे आहे असे सांगताना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
घोडावत विद्यापीठात यावेळी पत्नी नीता घोडावत, श्रेया घोडावत,श्रेणिक घोडावत, सलोनी घोडावत,विजयचंद घोडावत, राजेंद्र घोडावत, जयचंद घोडावत उपस्थित होते.
संजय घोडावत यांच्या बद्दल बोलताना मुलगा श्रेणिक यांनी आपल्या वडिलांचा एक मुलगा म्हणून जीवन प्रवास मांडला. त्याचबरोबर घोडावत उद्योग समूहाच्या भविष्यकालीन योजनांची माहिती दिली.याप्रसंगी ‘एस.जी.यु आयकॉन २०२३’पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दैनिक पुढारीचे संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव (पत्रकारिता),डॉ.बुधाजीराव मुळीक(कृषी),डॉ.मंगेश कराड(शिक्षण),डॉ,संतोष प्रभू(आरोग्य),क्रिकेटर स्मृती मानधना(क्रीडा) यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शाल श्रीफळ आणि मानपत्र हे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी कर्नाटक डीलर असोसिएशन यांच्या वतीने संजय घोडावत यांच्यावरील पुस्तक ‘आयडॉल’ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याचे संपादक संजय अकिवाटे, अनिल वाघमारे उपस्थित होते.संजय घोडावत यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, की आई-वडिलांनी, गुरूंनी रुजवलेल्या मूल्यानुसार माझे आचरण आहे, त्यामुळे मला हे यश मिळाले आहे. माझ्या यशात माझ्या सोबतच्या टीमचा खूप मोठा वाटा आहे. माणसाला मोठे होण्यासाठी त्याच्यामध्ये नम्रता, दान करण्याची आणि आदर देण्याची वृत्ती असायला हवी. आपल्यातील अहंकार बाजूला टाकून सकारात्मक विचाराने पुढे गेल्यास आपल्याला निश्चित यश मिळते.
यावेळी संजय घोडावत यांची मुलगी श्रेया हिने आपल्या मनोगतात म्हटले,की माझे वडील हे बिझनेसमन पेक्षाही सोशल चेंज मेकर आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीत समाजाप्रती, माणसांप्रती तळमळ दिसून येते. त्यांच्या कार्यामुळेच इथे हजारो लोक जमा झाले आहेत.या कार्यक्रमास विविध संस्थांचेअधिकारी,पदाधिकारी, पत्रकार बंधू-भगिनी, विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू डॉ अरुण पाटील कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, प्रा. विराट गिरी, सर्व डीन, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहम तिवडे यांनी तर आभार प्रदर्शन एस. एम.डिसूजा यांनी केले.