कैलासगडची स्वारी मंदिराच्या६३वा वर्धापनदिन सोहळानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
अध्यक्ष बबेराव जाधव, उपाध्यक्ष सत्यजीत जाधव यांची माहिती
कोल्हापूर/प्रतिनिधी : मंगळवार पेठ, खासबाग येथील कैलासगडची स्वारी मंदिराच्या६३वा वर्धापनदिन सोहळानिमित्त सोमवार दिनांक २७/२/२०२३ ते मंगळवार दिनांक ७/३/२०२३ या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष बबेराव जाधव, उपाध्यक्ष व युवा उद्योजक सत्यजीत चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कैलासगडची स्वारी मंदिराच्या६३वा वर्धापनदिनानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, भजन व सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, शाहिरी, सोंगी भजन व लहान मुला- मुलींची रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले असून, सर्व कार्यक्रम मंदिराच्या परिसरातच होणार आहेत. जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फौडेशन आणि कलायोगी जी. कांबळे सार्वजनिक आर्ट गॅलरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवार दि.५ मार्च रोजी हुतात्मा पार्क येथे चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. शुक्रवार दि. ३ मार्च रोजी रांगोळी स्पर्धा व हळदी-कुंकू समारंभ आयोजित करणेत आले आहेत. सोमवारी ६/३/२०२३ रोजी रात्री 10.00 वाजता शिवालय भजनी मंडळ यांचे भजन व रात्री १२.०० वा. शिवास रुद्राभिषेक धार्मिक विधीने घालणेत येणार आहे. मंगळवार दिनांक ७/३/२०२३ रोजी सकाळी 11.00 वाजता श्री सत्यनारायण पुजा व सायंकाळी ५.०० वाजता मर्दानी खेळ व सायंकाळी ६.०० वा. पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. पालखी सोहळ्या प्रसंगी पालखीचे पूजन माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील व आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर पालखी सोहळ्याचे उद्घाटन मंदिराचे अध्यक्ष बबेराव शंकरराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. शिवालय भजनी मंडळ यांचे भजन, धनगरी ढोल, झांजपथकाच्या गजरात पालखी सोहळा असून, पालखी समोर भव्य आतिषबाजी करण्यात येणार आहे. सायंकाळी ७.00 वाजता मंदिराचे अध्यक्ष मा. बबेराव शंकरराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटीलसो यांच्या हस्ते व मंदिराच्या विश्वस्त आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष व युवा उद्योजक सत्यजीत चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसाद वितरण सोहळा होणार आहे. स्वारींच्या आशिर्वादाने सर्व विश्वस्त व भागातील सर्व महिला व भक्तांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम होणार असल्याचे मंदिराचे सेक्रेटरी अशोक मेस्त्री व विलास गौड यांनी दिली.
यावेळी विश्वस्त मंडळातील महादेव महाराज यादव, अशोक मिस्त्री, माजी नगरसेवक संभाजी जाधव, शिवाजी जाधव, उदय कारंजकर, अशोक कांबळे, दीपक जाधव, किशोर भोसले, विठ्ठल जाधव, गणेश भोसले आदी उपस्थित होते.
कैलासगडची स्वारी मंदिराचे भक्त कोल्हापूर, महाराष्ट्रासह देशभर विविध भागात आहे. या भक्तांसाठी मंदिराचे संकेतस्थळ व लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष व युवा उद्योजक सत्यजीत चंद्रकांत जाधव यांनी दिली.