गोकुळच्या लिंगनूर (गडहिंग्लज)शितकरण केंद्रावर अत्याधुनीक कॅन वॅाशरची उभारणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या लिंगनूर(गडहिंग्लज) येथील दूध शीतकरण केंद्रावर अत्याधुनिक कॅन वॅाशरचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्वासराव नारायण पाटील यांचे शुभ हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील म्हणाले कि कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक सघामार्फत दररोज सरासरी १४.५० लाख लिटर्स दूधाचे संकलन केले जात आहे. यापैकी लिंगनूर येथील दूध शीतकरण केंद्रावर सहकारी संस्थाकडून दररोज सकाळ व सायंकाळ पाळीत मिळून दररोज सरासरी १ लाख ५० हजार ते २ लाख लिटर्स दूधाचे संकलन कॅनव्दारे होत आहे. यापूर्वी लिंगनूर येथील दूध शीतकरण केंद्रावर कॅनची स्वच्छता करणेसाठी ६०० कॅन प्रतितास क्षमतेचा कॅन वॅाशर कार्यरत होता.परंतू दैनंदीन दूध हाताळणीमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता संघाने संस्थाकडून आलेले कॅन खाली करून कॅन वॅाशरव्दारे स्वच्छ करून पुन्हा संस्थेस पाठविणे व हे काम जलदगतीने होणेसाठी नवीनच १२०० कॅन प्रतितास क्षमतेचा अत्याधुनीक कॅन वॅाशर संघाच्या लिंगनूर शीतकरण केंद्रावर बसविणेत आला आहे. नवीन बसविणेत आलेल्या कॅन वॅाशरमूळे दूधाचे कॅनची स्वच्छता चांगल्या प्रकारे व जलद होवून निर्जंतूक कॅन संस्थांना देता येणार आहेत. शिवाय यामूळे स्टीम व पाण्याचा वापर देखील कमी होवून बचत होणार असल्याचे संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील यांनी सांगितले.
यावेळी संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, प्रकाश पाटील, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, लिंगनूर शाखा अधिकारी शशिकांत गायकवाड, संकलन अधिकारी के.डी.आमते व संघाचे कर्मचारी उपस्थित होते.