पर्यटन क्षेत्रात ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ हे नाव विश्वसनीय ठरेल: सचिन चव्हाण
स्वीटकॉर्न हॉलिडेज चे शानदार उद्घाटन
कोल्हापूर/ प्रतिनिधी: गेल्या काही वर्षात पर्यटन व्यवसाय खूप वेगाने वाढत आहेत. त्याद्वारे विशेषता: अर्थव्यवस्था विकसित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पर्यटन हे फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणून उभारीस येत आहे. तिर्थटनाच्या माध्यमातून होणारे धार्मिक पर्यटन याला सरकारही चालना देत आहे. पण आता पर्यटन हे आधुनिक पर्यटन बनले असून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधांचे व्यवस्थापन व नियोजन हा मुद्दा समोर आल्याने नवनवीन संकल्पना विकसित करून पर्यटन व्यवसायाला बहुआयामी बनवण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तुमच्या इच्छित स्थळी जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे व्यवस्थापन व नियोजन पर्यटन-संस्था करून देत असतात. त्यामध्ये ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ हे नाव विश्वसनीय ठरेल, असा विश्वास माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात मंगळवार पेठ येथे नव्याने सुरू झालेल्या ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
लॉकडाऊन मध्ये पर्यटन क्षेत्र पूर्णपणे ठप्प होते. पण आता परिस्थिती निवळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पर्यटन स्थळे ही खुली होत आहेत. लवकर सर्व गोष्टी सुरळीत होऊन लोक पुन्हा आपल्या आवडीनुसार ट्रॅव्हलिंगसाठी बाहेर पडतील. हीच गरज ओळखून ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ पर्यटन क्षेत्रातील सर्व सोयी-सुविधा यामध्ये फ्लाईट बुकिंग, हॉटेल बुकिंग, इंटरनॅशनल व डोमेस्टिक पॅकेजेस,पासपोर्ट, रेल्वे,कार, क्रुज बुकिंग यासह सर्व सुविधा तुम्हाला परवडतील अशा तुमच्या बजेटनुसार उपलब्ध करून देईल आणि पर्यटकांना फक्त प्रवासाचा निव्वळ आनंद घेता येईल असे, ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ चे संचालक शिवांगी चिकोडीकर व आदित्य मोरे यांनी विशद केले. सायंदैनिक क्रांतिसिंहच्या संपादिका सुनंदा मोरे यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार शुभांगी तावरे, अक्षय थोरवत,महेश पाटेकर, आनंद चिकोडीकर,मयूर चिकोडीकर, सीमा पवार,सुरेश कुलकर्णी, स्मिता जोशी,मधुरा कुलकर्णी,विजया चिकोडीकर, कमल ढेकणे,अर्चना वाशीकर, गजाजन वाशीकर, आदी उपस्थित होते.