Wednesday, September 11, 2024
Home ताज्या 'सातारचा सलमान' ३ मार्चला येणार भेटीला

‘सातारचा सलमान’ ३ मार्चला येणार भेटीला

‘सातारचा सलमान’ ३ मार्चला येणार भेटीला

कोल्हापूर/प्रतिनिधी : हेमंत ढोमे यांचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. त्यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच जबरदस्त सिनेमे दिले आहेत. त्यांचा असाच एक जबरदस्त चित्रपट ३ मार्चला चित्रपटगृहात झळकणार आहे. प्रकाश सिंघी, टेक्सास स्टुडिओज निर्मित, रिलायन्स एन्टरटेन्मेंट प्रदर्शित ‘सातारचा सलमान’ या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत आदी नामवंत कलाकारांच्याही यात भूमिका आहेत. हेमंत ढोमे यांचीही झलक या चित्रपटात दिसत आहे. अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात नक्कीच यशस्वी ठरेल. या चित्रपटातील ‘सातारचा सलमान’ आणि ‘आय वॉन्ट टर्मरिक’ ही भन्नाट गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.
‘स्वप्नं बघितली तरंच पूर्ण होतात!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन असून ही कथा एका अशा तरुणाची आहे, ज्याचे हिरो बनायचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठीची त्याची मेहनत, त्याचा सामान्य मुलगा ते हिरो बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास, या प्रवासात त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी केलेली मदत यात दिसत आहे. मात्र त्याच्या आयुष्यात आलेले हे चढउतार त्याला कोणत्या वळणावर नेणार आणि त्याच्या समोर आलेली परिस्थिती त्याला खरंच हिरो बनवणार का, याचे उत्तर मात्र ‘सातारचा सलमान’ पाहिल्यावरच मिळणार आहे. या चित्रपटातील गाणीही संगीतरसिकांच्या पसंतीस उतरणारी आहेत. ‘सातारचा सलमान’ या प्रत्येकालाच ठेका धरायला लावणाऱ्या टायटल ट्रॅकला आदर्श शिंदे यांच्या आवाजाने अधिकच रंगत आली असून सुजित कुमार यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर ‘आय वॉन्ट टर्मरिक’ या मस्तीने भरलेल्या गाण्याला नागेश नॉर्वेकर यांच्या आवाजाचा साज चढला आहे. या दोन्ही गाण्याचे गीतकार क्षितिज पटवर्धन आहेत तर संगीतकार अमितराज आहेत.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात मोठं होण्याचं स्वप्न बघत असतो आणि या प्रवासात प्रत्येकाच्याच वाटेवर अनेक अडचणी येतात. कधीकधी अशी वेळही येते की, आता सगळं संपलं, असं वाटतं. मात्र आपण वाईटातूनही काही चांगलं बघितलं पाहिजे आणि आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. आयुष्यात आशावादी आणि सकारात्मक राहणे खूप गरजेचं आहे. आपण आपलं काम करत राहावं, त्यातूनच काहीतरी चांगलं निष्पन्न होतं, ही ऊर्जा देणारा हा चित्रपट आहे. हा एक धमाल, निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे, जो सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपल्यातीलच एक वाटेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments