Wednesday, October 9, 2024
Home ताज्या सिध्दगिरी कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवाचे जनआंदोलनात परिवर्तीत करून सकारात्मक बदल घडवूया -...

सिध्दगिरी कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवाचे जनआंदोलनात परिवर्तीत करून सकारात्मक बदल घडवूया – आचार्य देवव्रत

सिध्दगिरी कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवाचे जनआंदोलनात परिवर्तीत करून सकारात्मक बदल घडवूया – आचार्य देवव्रत

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारत ऋषी-मुनी यांची परंपरा असलेला, पंचमहाभूतांची पूजा करणारा देश आहे. आपण भौतिक विकास करतांना विदेशी संस्कृतीचे अंधानुकरण केल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. आज अचानक ढगुफुटी होते, तसेच अन्य अनेक समस्या निर्माण होत आहेत. आश्रमाच्या माध्यमातून विविध कार्य करत काडसिद्धेश्वर स्वामींजींनी आयोजित केलेला पंचमहाभूत लोकोत्सव एक जनआंदोलनात परिवर्तीत करून सकारात्मक बदल घडवू या, असे जाहीर /आवाहन गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. ते पंचमहाभूत लोकोत्सवात ५ व्या दिवशी जल तत्त्व-महिला उत्सवात पहिल्या सत्रात बोलत होते. या ‘ /वेळी व्यासपीठावर कर्नाटक सरकारच्या वक्फ, हज आणि धर्मादायमंत्री सौ. शशिकला जोल्ले, स्वामी संपूर्णानंद महाराज, राजस्थान येथील कृष्ण जाखड, ‘आय.आय.टी’ येथील प्रदीप मिश्रा, लोकभारतीचे गोपाल उपाध्याय, डॉ. हर्षा हेगडे, जलतज्ञ राजेंद्रसिंह, इचलकरंजीच्या नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
वेळीच पाण्याचा दुरुपयोग टाळा, अन्यथा पृथ्वी कदापी क्षमा करणार नाही ! – डॉ. हर्षा हेगडे
स्त्री आणि पाणी यांना एकमेकांपासून दूर करता येऊ शकत नाही. प्रत्येक जीवसृष्टीचा मुख्य घटक ‘पाणी’ आहे. पाणी हे इतके महत्त्वपूर्ण आहे की, भारतात पाण्याचेही पूजन केले जाते. गंगामातेचे पूजन केले जाते. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका, अन्यथा पृथ्वी आपल्याला कदापी क्षमा करणार नाही.’’
केमिकल आस्थापनांनी आतापर्यंत सर्वांत अधिक पर्यावरणाचा र्‍हास केला – प्रदीप मिश्रा
सध्या संपूर्ण विश्व पर्यावरणाच्या समस्यांनी पीडित आहे. अशा परीस्थितीत पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. रासायनिक आस्थापनांनी आतापर्यंत सर्वांत अधिक पर्यावरणाचा र्‍हास केला आहे. ‘स्त्री’मध्ये समाजाला सर्वश्रेष्ठ स्थानी नेण्याची शक्ती आहे. त्यामुळे स्त्रियांकडून पर्यावरण रक्षणाचे संस्कार मुलांवर होणे आवश्यक आहे. मानवाच्या अयोग्य जीवनप्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे, ते टाळल्यास जलस्रोतांना पुन्हा पुनर्जीवन प्राप्त होईल.
तर वर्ष २०५० पर्यंत जलसंकट महाभयंकर रुप धारण करेल ! – गोपाल उपाध्याय, लोकभारती
नदीच्या किनारी रहाणार्‍या शेतकर्‍यांनी शेतीच्या पद्धतीत पालट करून नैसिर्गित शेती करण्याचा प्रयत्न करावा. लोकभारतीच्या माध्यमातून विविध स्तरांवर जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जलप्रदूषणाच्या संदर्भात समाज वेळीच जागृत न झाल्यास वर्ष २०५० पर्यंत जलसंकट महाभयंकर रुप धारण करेल.
समाजाने पर्यावरण जपण्यास शिकायला हवे – सौ. शशिकला जोल्ले, मंत्री, वक्फ, हज आणि धर्मादायमंत्री, कर्नाटक
भारत देश संस्कृती, संस्कार आणि अध्यात्म यांनी भरलेला आहे. त्यामुळे आपण भारतभूमीत जन्माला आलो हे परमभाग्य आहे. लोक देशाची संस्कृती विसरत असल्याने महापूर, भूकंप, कोरोना यांसारखे संकटे येत आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून पंचमहाभूतांचे महत्त्व आणि जतन होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केल्याविषयी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. सध्याच्या काळात समाजाने अधुनिकतेच्या नावाखाली पिझ्झा, बर्गर यांच्या आहारी जाण्याऐवजी पर्यावरण जपण्यास शिकले पाहिजे. वेळीच पाणी रक्षणासाठी उपाययोजना केल्या नाहीत, तर पाण्यावरून महायुद्ध होईल. वृक्षांच्या संवर्धनासाठी आम्ही निपाणी मतदारसंघात महिलांना प्रत्येकी १४ फळझाडांची रोपे दिली आणि त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यास सांगितले, तसेच त्यांना घरगुती भाजीपाला लावण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

चौकट
एक किलो मांस सिद्ध करण्यासाठी एक सहस्र लीटर पाणी व्यय होते. त्यामुळे एका व्यक्तीने मांसाहार सोडल्यास १०० लोकांची तहान भागू शकते, असे प्रदीप मिश्रा यांनी नमूद केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्तुर येथील...

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा   कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...

Recent Comments