“खासदार चषक”खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळचा श्रीराज भोसले अजिंक्य तर पुण्याचा निखिल दीक्षित उपविजेता ,कोल्हापूरचा सम्मेद तृतीय
पालकांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक – खासदार धनंजय महाडिक यांचे उदगार
पुलाची शिरोली/प्रतिनिधी : मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी :- जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या खासदार चषक खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीनंतर आठवा मानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले तृतीय मानांकित पुण्याचा निखिल दीक्षित व अग्रमानांकित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे या तिघांचे समान आठ गुण झालेमुळे सरस टायब्रेक गुणामुळे रेंदाळचा श्रीराज भोसले अजिंक्य ठरला तर पुण्याच्या निखिल दीक्षितला उपविजेत्यापदावर व अग्रमानांकित कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटेला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. श्रीराजला रोख २१ हजार रुपये व आकर्षक चषक, निखिल ला रोख पंधरा रुपये व आकर्षक चषक तर सम्मेद ला रोख दहा हजार रुपये व आकर्षक चषक खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल, हायवे लगत, पुलाची शिरोली,कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेऱ्यात झाल्या.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही प्रवेश शुल्क नसलेली ही भारतातली पहिलीच खुली जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आहे.* याशिवाय परगावच्या खेळाडूंची राहण्याची मोफत सोय करण्यातआली व सर्व खेळाडू पालकांना स्पर्धा स्थळी मोफत चहा नाश्ता व दुपारचे जेवण देण्यात आले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ आदरणीय खासदार धनंजय महाडिक बी चॅनेल चे चेअरमन व खासदार क्रीडा महोत्सवचे प्रणेते पृथ्वीराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थित झाला.यावेळी स्पर्धेचे मुख्य आंतरराष्ट्रीय पंच व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, मुख्य स्पर्धा संचालक मनीष मारुलकर, स्पर्धा सचिव धीरज वैद्य, स्पर्धा समन्वयक उमेश पाटील सर व उत्कर्ष लोमटे सर व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जीवनात खेळाचे महत्व पटवून दिले व पालकांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आवाहन केले. या स्पर्धेच्या उत्तम संयोजनाबद्दल संयोजक व पंचांचे कौतुक करून आभार मानले व पुढच्या वेळी या स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले त्यांना इचलकरंजीचे करण परीट, रोहित पोळ व विजय सलगर सांगलीचे पौर्णिमा उपळवीकर विजय माने व दीपक वायचळ, कोल्हापूरचे मनीष मारुलकर,आरती मोदी, सूर्याजी भोसले,उत्कर्ष लोमटे व महेश व्यापारी व सोलापूरचे उदय वगैरे यांचे सहकार्य लाभले. सीमा पुजारी, आनंदराव कुलकर्णी, राजू सोन्याच्या, अमित मोदी, राठोड मॅडम, रवींद्र निकम, डॉ. हरीश पाटील, प्रभाकर कांबळे, शेवडे साहेब, खान मॅडम, विजय माने सर, उदय वगैरे सर,कविता पाटील, गिरीश बाचीकर, यांच्या हस्ते सर्व उत्तेजनार्थ बक्षीस वितरित करण्यात आली.
बक्षीस विजेते पुढील प्रमाणे
खुला गट १५ बक्षिसे
१)श्रीराज भोसले रेंदाळ २) निखिल दीक्षित पुणे ३) सम्मेद शेटेे कोल्हापूर ४) ओंकार कडव सातारा ५) राहुल शर्मा पुणे ६) अभिषेक गणीगेर बेळगाव ७) निरंजन नवलगुंद बेंगलोर ८) मानस गायकवाड सोलापूर ९) सुयोग वाघ अहमदनगर १०) ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर ११) पुष्कर ढेरे मुंबई १२)सोहम खासबारदार कोल्हापूर १३) तुषार शर्मा कोल्हापूर १४) अभिषेक पाटील मिरज १५) प्रणव पाटील कोल्हापूर.
उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू (६० वर्षावरील)
१) राजू सोनेचा सांगली २) रवींद्र कुलकर्णी कोल्हापूर ३) दिलीप कुलकर्णी सांगली ४) माधव देवस्थळी कोल्हापूर ५) भारत पाटोळे निपाणी.
उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू
१) ऋचा पुजारी कोल्हापूर २) दिव्या पाटील जयसिंगपूर ३) श्रेया हिप्परगी जत ४) दिशा पाटील जयसिंगपूर ५ शर्वरी कबनूरकर कोल्हापूर.
उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू
१) अभिजीत कांबळे तासगाव २) मोहसीन सय्यद राजापूर ३) विनोद सावंत पुणे.
उत्कृष्ट बिगर गुनांकित बुद्धिबळपटू
१) सिद्धेश नार पुणे २) स्वरूप साळवे गडहिंग्लज ३) दीपक क्षीरसागर लोणंद ४) पुनम चांडक धारवाड ५) सिद्धांत तेलकर लोणंद.
उत्कृष्ट कोल्हापूर जिल्ह्यातील बुद्धिबळपटू
१) श्रीधर तावडे कोल्हापूर २) अथर्व चव्हाण कोल्हापूर ३) इम्रान बारस्कर शिरोली ४) आदित्य आळतेकर कोल्हापूर ५) शंकर साळुंके कोल्हापूर.
उत्कृष्ट तेराशे गुणांकनाखालील बुद्धिबळपटू
१) विवान सोनी इचलकरंजी २) बालकृष्ण पेडणेकर सावंतवाडी ३) प्रदीप दहाडे पुणे ४) सृष्टी हिप्परगी जत ५) हर्ष शेट्टी सांगली.
उत्कृष्ट सोळाशे गुणांकनाखालील बुद्धिबळपटू
१) दीपंकर कांबळे फलटण २) शर्विल पाटील कोल्हापूर ३) अनिश नाईक गोवा ४) प्रवीण कामत कर्नाटक ५) प्रदीप आवडे सातारा.
उत्कृष्ट एकोणवीसशे गुणांकनाखालील बुद्धिबळपटू
१) प्रशांत नाईक मेंगलोर २) आदित्य सावळकर कोल्हापूर ३) रवींद्र निकम इचलकरंजी ४) मुद्दसर पटेल मिरज ५) संतोष कांबळे कोल्हापूर.
उत्कृष्ट पंधरा वर्षाखालील बुद्धिबळपटू
१) सुयोग वडके पुणे ३) अपूर्व देशमुख सातारा ३) प्रसन्ना जगदाळे बेळगाव ४) साई मंगनाईक बेळगाव ५) ईश्वरी जगदाळे सांगली.
उत्कृष्ट तेरा वर्षाखालील बुद्धिबळपटू
१) अथर्व तावरे इचलकरंजी २) आदित्य चव्हाण सांगली ३) प्रज्वल वरुडकर कोल्हापूर ४) विक्रमादित्य चव्हाण सांगली ५) सोहम शेटे बार्शी.
उत्कृष्ट अकरा वर्षाखालील बुद्धिबळपटू
१) कश्यप खाकरीया सांगली २) अभय भोसले जांभळी ३) सान्वी गोरे बार्शी ४) रियार्थ पोद्दार इचलकरंजी ५) अद्विक फडके सांगली.
उत्कृष्ट नऊ वर्षाखालील बुद्धिबळपटू
१) शौर्य बगाडिया इचलकरंजी २) वरद पाटील बस्तवडे ३) वेदांत बांगड इचलकरंजी ४) अर्णव पाटील कोल्हापूर ५) सिद्धांत थबज बेळगाव.
उत्कृष्ट सात वर्षाखालील बुद्धिबळपटू
१)अन्वेषा सोनी इचलकरंजी २)सुरज सलगर इचलकरंजी ३) प्रज्ञेश घोरपडे कोल्हापूर.