मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांनी केली विविध स्टॉलची पाहणी .
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित ‘ सुमंगलम् पंचमहाभूत ‘ या लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉलची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तरित्या केली .
कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर, महसूल विभागातर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉलचे दिप प्रज्वलन तर पर्यावरण व वातावरणीय बदल आणि प्रदूषण नियत्रंण मंडळाच्या स्टॉलचे फित कापून या दोघांच्या हस्ते औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले . त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्हॅनला दोघा मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखविला . हवामान बदलाचे परिणाम, कारणे व उपाय या अनुषंगाने या स्टॉलवर माहिती देण्यात येते तर महसूल विभागाच्या स्टॉलवर विविध दाखले . फेरफार , नोंदणी आदींची सविस्तर माहिती या ठिकाणी नागरिकांकरिता उपलब्ध आहे . या स्टॉलच्या उभारणीबद्दल मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले . या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा. प्रा . संजय मंडलिक, खा . धैर्यशिल माने , विभागीय आयुक्त सौरभ राव, पर्यावरण विभागाचे सदस्य सचिव प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मनपा आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे, काड सिद्धेश्वर स्वामी महाराज, भैय्याजी जोशी, हवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सह संचालक डॉ. विद्यानंद मोटघरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .