Friday, September 13, 2024
Home ताज्या १२ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! तर उद्या १० फेब्रुवारीला वाहनफेरी ...

१२ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! तर उद्या १० फेब्रुवारीला वाहनफेरी – श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

हिंदूसंघटन आणि ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी कोल्हापूर येथे १२ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! – श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

उद्या १० फेब्रुवारीला वाहनफेरी काढली जाणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय-आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’, भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२३  या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, खरी कॉर्नर, कोल्हापूर येथे सायंकाळी ६ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येणार आहे, व या सभेच्या प्रचारासाठी उद्या १० फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता वाहनफेरी काढण्यात येणार आहे.अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते.
या सभेसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, भाजप कोल्हापूर जिल्हाउपाध्यक्ष श्री. सचिन तोडकर यांनी पाठिंबा घोषित केला आहे.
या सभेविषयी माहिती देताना श्री. किरण दुसे पुढे म्हणाले, ‘‘या सभेत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे  अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत. हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्ह्यातही व्यापक कार्य चालू असून हिंदू संघटन मेळावे, ‘हलाल’सक्तीच्या विरोधात जागृती यांसह राष्ट्र आणि धर्म यांवर आघात करणार्‍या विविध विषयांवर निवेदन, आंदोलन, पत्रकार परिषद, धर्मशिक्षणवर्ग या माध्यमातून जनजागृती चालू आहे. गडहिंग्लज येथे १० जानेवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली. या सभेला ७ हजार हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यात एकूणच हिंदुत्वाच्या कार्याला प्रतिसाद वाढत असून इचलकरंजी, कोल्हापूर आणि गडहिंग्लज येथे झालेले भव्य मोर्चे हे हिंदू संघटित होत असल्याचे उदाहरण आहे. सभेच्या निमित्ताने शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये प्रसार चालू असून गेले विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, रिक्शा, होर्डिंग, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे.’’
या सभेच्या प्रचारासाठी उद्या १० फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता वाहनफेरी काढण्यात येणार आहे. ही वाहनफेरी मिरजकर तिकटी येथून प्रारंभ होईल. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल – टिंबर मार्केट कमान – उभा मारुति चौक – तटाकडील तालीम – निवृत्ती चौक – बिनखांबी गणेश मंदिर – महाद्वार रोड – छत्रपती शिवाजी महाराज चौक – भवानी मंडप – बिंदू चौकमार्गे मिरजकर तिकटी येथे फेरीची सांगता होईल. तरी या फेरीसाठी आणि १२ फेब्रुवारीला होणार्‍या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. किरण दुसे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments