ड्रेनेज लाईनचा प्रश्न कायमस्वरूपीचा सोडवू : आमदार जयश्री जाधव
पद्माराजे उद्यान, फिरंगाई तालीम प्रभागात विविध विकासकामाचा शुभारंभ
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील ड्रेनेज लाईन संदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. ड्रेनेज लाईन खराब असल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात. त्यामुळे आज पर्यंत दोन कोटीहून अधिक रुपयांचा आमदार निधी शहरातील ड्रेनेज लाईन साठी दिलेला आहे. परंतु यामध्ये शहरातील पूर्ण ड्रेनेजलाइन बदलणे शक्य नाही आणि त्यासाठी आमदार निधीही पुरेसा नाही. यामुळे शहरातील ड्रेनेज लाईन बदलण्याचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून, त्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळून शहरातील ड्रेनेज लाईनची कामे सुरू होतील. त्यानंतर शहरातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल असा विश्वास आमदार
जयश्री चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ५५ पद्माराजे उद्यान व प्रभाग क्रमांक 47 फिरंगाई तालीम अंतर्गत विविध विकासकामाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी प्रभाग क्रमांक ५५ पद्माराजे उद्यान अंतर्गत खंडोबा देवालय परिसरातील ड्रेनेज लाईन, बापू ग्रुप येथील काँक्रीट पॅसेज तसेच प्रभागात ठिकठिकाणी गटर्स आणि प्रभाग क्रमांक 47 फिरंगाई तालीम अंतर्गत फिरंगाई काळकाई मंदीर जवळ ऑरेंज हॉस्पिटल ते आर. के. ड्रेसर्स, काळकाई मंदीर ते महालक्ष्मी क्लिनिक व कावळेकर घर ते ओंकार ग्रुप येथे ड्रेनेज लाईन या विकासकामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
आमदार जाधव म्हणाल्या, मतदारसंघात सुरू असलेली सर्वच कामे गुणवत्तापूर्ण आणि उच्च दर्जाची झाली पाहिजे अशा सूचना ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी यांना दिलेले आहेत. आपल्या भागात सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजेत, याकडे नागरिकांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. गुणवत्ता पूर्ण झालीच पाहिजेत यासाठी, भागातील नागरिकांनी ही दक्ष रहावे आणि कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे.यावेळी माजी नगरसेवक विक्रम जरग, माजी नगरसेवक अजित राऊत, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, अजय इंगवले, आर. डी. पाटील, महेश चौगुले, मनोज पाटील, शेखर पोवार, सुरेश पाटील, संपत चव्हाण, मोहन ससे, नितीन खानापूरकर, माणिक खांडळेर, प्रदीप नागावकर, प्रकाश निरुयेकर, बंडोपंत देवकर, महादेवराव धाडम, रमेशचंद्र काळेसकर, अरविंद ससे, प्रदीप कुलकर्णी, अनुप काळे, सरिता काळे, मिरा ससे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.