रियाझ स्कूल ऑफ कथक संस्थेच्या १० व्या वर्षपूर्ती निमित ” उमंग ” कार्यक्रमाचे आज ३ फेब्रुवारीस आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : “रियाझ स्कूल ऑफ कथक या संस्थेची १० वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण करून ११ व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे. हा आनंदउत्सव साजरा करण्या करता ०३ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ५ वाजता संस्थेचा “उमंग” हा नृत्य सादरीकरणाचा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये कथक नृत्याचे पारंपरिक अंगांपैकी ताल, तराणा सरगम, भजन, होरी इत्यादी याच बरोबर आधुनिक पद्धतीचे फ्युझन नृत्याचे सादरीकरण होणार आहे. “रियाझ स्कूल ऑफ कथक घ्या संस्थापिका सौ. प्राची फडणीस यांनी बॅचलर ऑफ कॉमर्स च्या पदवी बरोबर कथक अलंकार पदवी मिळवली आहे. त्या गुरु सौ शंभवी दांडेकर यांच्या शिष्या आहेत. या गुरुकुलमधून सौ प्राची फडणीस यांनी गेले १० वर्षामध्ये अथक परिश्रमातून अनेक मुलींना या कथक कलेच्या माध्यमातून घडविले आहे ज्या मुली आज या कलेच्या क्षेत्रा मध्ये नाव कमवीत आहेत. आज रोजी त्यांच्याकडे विविध वयोगटातील ७० हुन अधिक मुली या कलेचे अध्ययन करत आहेत… या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. सौ. मधुरिमा राजे छत्रपती व गुणिदास फौडेशनचे संस्थापक मा. श्री. राजप्रासाद धर्मधिकारी यांची असणार आहे. या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित राहून या नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सौ.प्राची फडणीस यांनी केले आहे.