डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये ‘शिशु रक्षा’ विभागाचा शुभारंभ
-‘रोटरी सनराईज’च्या देणगीतून साकारला अत्याधुनिक नवजात शिशु विभाग – ‘स्पाईन केअर’ युनिटसाठी वैदयकीय उपरणे प्रदान
शिशु रक्षामध्ये मोफत उपचार- डॉ संजय डी पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी :
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या देणगीतून उभारलेल्या अत्याधुनिक ‘शिशु रक्षा’ या नवजात शिशु विभागाचे उद्घाटन बुधवारी इंडियन अकाडमी ऑफ पेडीयाट्रीक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. व्ही. बसवराज व डी वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
रोटरी सनराईजच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘शिशु रक्षा’ विभागात दाखल होणाऱ्या सर्व नवजात बालकांवर मोफत उपचार करण्याची घोषणा डॉ संजय डी पाटील यांनी केली.
यावेळी बोलताना डॉ पाटील म्हणाले, रोटरी सनराईजचे नेहमीच सहकार्य मिळत आले आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून नेहमीच गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा आम्ही देत आलो आहोत व यापुढेही देऊ. रोटरीच्या माध्यमातून मिल्क बँक उभारणीसाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बसवराज म्हणाले, डी वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून उत्तम डॉक्टर घडवण्याचे काम सुरु आहे. या जगात नव्याने पाऊल टाकणाऱ्या मुलांसाठी हा शिशु रक्षा विभाग मोठी जबाबदारी पार पाडेल याची खात्री आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब रुग्ण व विद्यार्थानाही फायदा मिळेल. अतिशय तळागाळातील लोकांना उत्तम सेवा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या या शिशु रक्षा विभागात व्हेंटिलेटर, बेबी वॉर्मर, इनक्यूबेटर, फोटोथेरेपी अशा अत्याधुनिक मेडिकल साहित्यांचा समावेश आहे. रोटरी फाउंडेशन व मॉरिशीस येथील रोटरी क्लब आणि कोल्हापुरमधील रोटरी सनराईज यांच्या संयुक्त प्रयत्नांनी ७५ लाख रुपये खर्च करून ग्लोबल ग्रँट उपक्रमांतर्गत हा २० बेडचा हा नवजात शिशु विभाग साकारला आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांना माफक दरामध्ये मणक्यावरील शस्त्रक्रियेवरील उपचार घेता यावेत यासाठी रोटरी सनराइज तर्फे ४० लाख रुपयांची उपकरणे हॉस्पिटलला दिली जात असल्याची माहिती माजी अध्यक्ष सचिन मालू यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर डॉ. जी. व्ही. बसवराज व डॉ. संजय डी. पाटील, डीस्ट्रीक गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे, अध्यक्ष हृषीकेश खोत, डी वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, गौरीश धोंड, पंकज शहा, सचिन मालू. राहुल कुलकर्णी, दिव्यराज वसा व डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी राहुल कुलकर्णी यांनी शिशु रक्षा विभाग व तेथे उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती दिली. डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून गेली २० वर्षे सामाजिक जबाबदारीतून सुरू असलेल्या वैद्यकीय सेवेने प्रभावित होऊन या ठिकाणी ही वैद्यकीय मदत दिल्याचे सांगितले.अर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ एस. ए. लाड यांनी स्पाइन विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सुविधांची माहिती दिली.यावेळी बोलताना पंकज शहा यांनी ग्रामीण भागासाठी अशी नवजात शिशु साठी सुविधा उपलब्ध करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी बोलताना गौरीश धोंड यांनी रोटरी सनराईजच्या वतीने नेहमीच गरजू लोकांसाठी सहकार्य केले आहे.व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरीमध्ये चांगले काम केले जात आहे.गरजवंतांना देण्यासाठी मी रोटरी सनराईजसोबत मी राहीन असे सांगितले.
यावेळी रोटरी सनराईज क्लब कोल्हापूरचे ,सचिव दिव्यराज वसा,नासिर बोरसदवाला, शरद पै, अरुण भंडारे, राहुल कुलकर्णी, राजेश साळगावकर,सुभाष कुत्ते, करुणाकर नायक, सचिन झंवर, विक्रांत कदम, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ व्ही. व्ही. भोसले, श्रीधर स्वामी, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैदयकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, प्राचार्य डॉ महादेव नरके, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांच्यासह विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते