Tuesday, October 8, 2024
Home माय मराठी सिद्धगिरीच्या लोकोपयोगी प्रकल्पात नेहमी रोटरी कल्बचे सहकार्य राहील : विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश...

सिद्धगिरीच्या लोकोपयोगी प्रकल्पात नेहमी रोटरी कल्बचे सहकार्य राहील : विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे

सिद्धगिरीच्या लोकोपयोगी प्रकल्पात नेहमी रोटरी कल्बचे सहकार्य राहील : विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे

महाराष्ट्रातील पहिल्या कुत्र्यांच्या शाळेचे उद्घाटन व सिद्धगिरी हॉस्पिटल येथे मॅमोग्राफी आणि न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीम लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘सिद्धगिरी मठावर पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबवण्यात येतात,रोटरी क्लब-सनराईज यात योगदान देण्यासाठी सदैव आघाडीवर असेल.’ असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज, चंद्रकांत राठोड व सिद्धगिरी मठ यांच्या संयुक्त विद्यमानाने सिद्धगिरी मठ, कणेरी येथे राज्यातील पहिल्या भटक्या कृत्रांच्यासाठी ‘सिद्धगिरी शुनक सेवा धाम’चे व सिद्धगिरी हॉस्पिटल येथे मॅमोग्राफी आणि न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीम लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले.
कणेरी मठ येथे शवन(श्वान) प्रकल्प उभारणी व सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये न्यूरो मॉनिटरिंग मशीन व मॅमोग्राफी युनिट आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केला गेला आहे या सर्व उपक्रमांचा उदघाटन कार्यक्रम आज कणेरी मठ येथे संपन्न झाला.भटक्या कुत्र्यांचा अलीकडे वावर अधिकच वाढत चालला अशा कुत्र्यांची शवन प्रकल्प उभारणीत रोटरी सनराईज, चंद्रकांत हंजारीमलजी राठोड परिवार व कणेरी मठ यांच्या सामूहिक प्रयत्नातून कणेरी मठ यांचा महत्वाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील पहिली अशी भटक्या कुत्र्यांसाठी श्वान शाळा आहे.यात एकूण ४०० भटक्या कुत्र्यांना आश्रय दिला जाणार आहे. व त्यांचे पालन पोषण केले जाणार आहे. असा हा एक वेगळा प्रकल्प या ठिकाणी सुरू केला गेला आहे.त्या प्रकल्पासाठी एकूण ९० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.भारतात प्रथमच मोठ्या प्रमाणात श्वानाची शाळा रोटरीतर्फे उभारण्यात आली आहे. आणि पुढे भविष्यात गरज असल्यास शाळा वाढवून कुत्र्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न सनराईज क्लब करणार आहे.
तसेच या ठिकाणी सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर साठी अद्ययावत असे मेंदूवरील जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी गरजेचे असलेले ६५ लाख रुपये किंमतीचे “न्यूरो मॉनिटरिंग मशीन” द रोटरी फाउंडेशन व मदाग्रास्कर रोटरी क्लब व रोटरी सनराइज कोल्हापूर यांच्या आर्थिक सहकार्यातून देण्यात आले.शिवाय कॅन्सर तपासणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे “मॅमोग्राफी युनिट”प्रदान केले गेले त्याचे उदघाटन आज अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामीजी व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामीजी यांनी माणसातील संवेदनशीलता संपत चालली असून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कणेरी मठ येथे भटक्या गरजू श्वानासाठी शवन प्रकल्प उभा करण्यात आला आहे.माणसाला जशी वृद्धाश्रमाची आवश्यकता असते.तशीच आता श्वानानाही आता ती गरज निर्माण झाली आहे.यावेळी बोलताना पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी मानवी जीवनाच्या विविध पैलूंचे दर्शन उदाहरण देऊन केले व रोटरी क्लब करत असलेल्या समाज उपयोगी कामांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना रोटरी सनराइजचे माजी अध्यक्ष सचिन मालू यांनी रोटरी सनराईच्या वतीने कणेरी मठ येथे आमच्या हातून जो उपक्रम राबविला गेला आहे तो एक खारीचा वाटा आहे मात्र यापुढेही रोटरी सनराईज कणेरी मठासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली. रोटेरियन प्रसन्न देशिंगकर यांनी रोटरी सनराईज २०१४ पासून सिद्धगिरी कनेरी मठ साठी विविध उपक्रम राबवत आली आहे याही पुढे रोटरी सनराईज सहकार्य करण्यास पुढे येईल व कणेरी मठावर सध्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविला जात आहे ज्या प्रकल्पाद्वारे आजूबाजूच्या परिसरातील पाणी पुनर्वापरासाठी तयार केले जाणार असल्याचे सांगितले.रोटेरियन पंकज शहा
यांनी रोटरी सनराइज हा २०१४ पासून सिद्धगिरी मठाशी जोडला गेला असून सिद्धगिरीच्या सर्व प्रकल्पांद्वारे ना नफा ना तोटा तत्त्वावर सेवा पुरविला जात असल्याचे सांगितले. माजी प्रांतपाल गौरीश धोंड यांनी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक या ठिकाणी रोटरी सनराइज सहकार्य करत आले असून धारवाड येथेही अनेक प्रकल्प राबवले गेले आहेत याची माहिती दिली.
डॉ. शिवशंकर मरजक्के म्हणाले सिद्धगिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर साठी रोटरी क्लबने दिलेल्या ऑक्सिजन प्लॅन्ट व नेत्र तपासणी व्हॅन यामुळे आज पर्यंत ना नफा ना तोटा या तत्वावर हजारो रुग्णांना लाभ जाहला आहे .तसेच सिद्धगिरी हॉस्पिटल येथे मॅमोग्राफी मुळे स्तनावरील कर्करोगावर निदान व उपचार आता उपलब्ध झाले आहेत आणि न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीममूळे मेंदू व मणक्याच्या शास्त्रक्रिया होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
शुनक सेवा प्रकल्पाची माहिती रोटरीयन दिव्यराज वसा व चंद्रकांत राठोड विक्रमसिह कदम यांनी माहिती दिली .
या उद्घाटन सोहळ्यासाठी रोटरी सनराईजतर्फे माजी अध्यक्ष सचिन मालू व सचिव दिव्यराज वसा आणि इतर क्लबचे पदाधिकारी व सदस्य यामध्ये विक्रांत सिंह कदम, प्रसन्न देशिंगकर, राहुल.आर. कुलकर्णी, सचिन झंवर,राजूभाई परीख,चंद्रकांत राठोड, इंद्रजीत दळवी, डॉ. सचिन पाटील यांचे याला मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभले आहे.
तर या उद्घाटन अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामीजी रोटरी सनराईजचे सध्याचे अध्यक्ष ऋषिकेश खोत, व सचिव राहुल.एस. कुलकर्णी, यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ पार पडला. या पायाभरणी व हस्तांतरण कार्यक्रमास रोटरी इंटरनॅशनल व रोटरी जिल्हा ३१७० तर्फे माजी प्रांतपाल गौरीश धोंड, विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे व भावी होणारे प्रांतपाल नासिर बोरसदवाला, शरद पै, अरुण भंडारे व माजी सहाय्यक प्रांतपाल करुणाकर नायक व विद्यमान सहाय्यक प्रांतपाल सुभाष कुत्ते, डिस्ट्रिक्ट ऑफिसर अजय मेनन आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व गरजू जनतेने या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी अध्यक्ष सचिन मालू यांनी केले आहे.कार्यक्रमाचे आभार सिद्धगिरी हॉस्पिटलचे धनंजय जाधव यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्तुर येथील...

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा   कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...

Recent Comments