कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने ‘केएमए कॉन’ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन
कोल्हापूर /प्रतिनिधी :वैद्यकीय क्षेत्रात सतत होणारे बदल यामध्ये आजाराचे निदान आणि उपचार यासाठी नवनवीन तपासणी पद्धत, उपचार पद्धती, औषधे निर्माण होत असतात. या नवीन संकल्पना, अत्याधुनिक निदान साधने, नवीन उपचार पद्धतीचे ज्ञान वैद्यकीय व्यावसायिकाला असणे आवश्यक आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा ‘मेडिकल हब’ म्हणून विकसित होत आहे. यासाठी येथील तज्ञ डॉक्टर्सना हे नवीन बदल आत्मसात करता यावेत म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील जिल्ह्यातील शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने ‘केएमए कॉन’ 2023 या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन येत्या शनिवारी दिनांक 28 व रविवारी 29 जानेवारी 2023 रोजी हॉटेल सयाजी येथे करण्यात आले आहे. प्रतिवर्षी निरनिराळे विषय घेऊन गेली अनेक वर्षे ही वैद्यकीय परिषद भरवण्यात येते. यावर्षी United….We Forge Ahead… या संकल्पनेवर या परिषदेत चर्चा होणार असून कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून 300 हून अधिक तज्ञ डॉक्टर्स सहभागी होणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.गीता पिल्लाई आणि मानद सचिव डॉ.ए.बी.पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या परिषदेचे उद्घाटन 28 जानेवारी रोजी शनिवारी सहा वाजता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावर्षीच्या डॉ.अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्काराने कोल्हापुरातील जेष्ठ युरोलॉजिस्ट डॉ. प्रकाश गुणे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या परिषदेत डॉ. गौतम अरोरा, डॉ. मन्सूरअली सिताबखान, डॉ. तन्मई ठोंबरे, डॉ. अनिकेत मोहिते, डॉ. नीनाद देशमुख, डॉ. वासिम काझी, डॉ. वरून बाफना, डॉ. निकिता दोशी, डॉ. किरण दोशी, डॉ. सुरज पवार, डॉ. अक्षय शिवचंद, डॉ. चंद्रशेखर पेठे, डॉ. विनय थोरात, डॉ. आदित्य कुलकर्णी, डॉ. विलास नाईक, डॉ. अर्जुन अडनाईक, डॉ. अजिंक्य देशपांडे, डॉ. श्याम ठक्कर, डॉ. साईप्रसाद हे विविध विषयांवर चर्चासत्रात उपस्थित त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती या वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. साईप्रसाद, उपाध्यक्ष डॉ. अभिजीत कोराणे तसेच सचिव डॉ. संगीता निंबाळकर यांनी दिली. पत्रकार परिषदेस प्रसिद्धी प्रमुख डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. आशा जाधव,डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. अरूण धुमाळे,डॉ. शितल पाटील,डॉ. नीता नरके,डॉ. देवेंद्र जाधव, डॉ. आशुतोष देशपांडे, डॉ. गौरी साईप्रसाद, डॉ. अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.