कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचा टी. शर्ट व मेडलचे अनावरण
कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर प्रायोजित केएससी रगेडियन कोल्हापूर रन ही अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा १२ फेब्रुवारी रोजी होत आहे. या ‘कोल्हापूर रन’च्या टी शर्ट व मेडलचे अनावरण शनिवारी सायंकाळी ५ वाजता आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. डी. वाय.पी.मॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे चेतन चव्हाण,रगेडियनचे आकाश कोरगावकर, माजी उपमहापौर संजय मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी भारतात आयोजित केली जाणारी ही मोठी मॅरेथॉन आहे.यात स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
डी. वाय. पाटील प्रिझेंट्स केएससी रगेडियन कोल्हापूर रन पावर्ड बाय एस. जे.आर टायर्स, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब क्लब (केएससी) व रगेडियन क्लब यांच्या वतीने येत्या १२ फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा पोलीस मैदानावर होत आहे. ‘कोल्हापूर रन’च्या नाव नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ५,१०,२१,४२ आणि ५० किलोमीटर अशा पाच गटात ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना १० लाखांपेक्षा जास्त रक्कमेची बक्षीसे मिळणार आहेत. कोल्हापूरच्या पर्यटन वाढीसाठी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉनसाठी ८ हजार पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होतील असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला.
कोल्हापूर शहरात घेतली जाणारी ही इतकी मोठी भारतातील एकमेव मॅरेथॉन स्पर्धा आहे, ‘कोल्हापूर रन’ ही केवळ मॅरेथॉन नसून आपल्या कोल्हापूर शहराचा कार्निव्हल आहे, ज्यामध्ये हजारो लोकांचा एक मोठा वर्ग एकत्र येऊन हा आनंदोत्सव साजरा करतात. स्पर्धेत नाव नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना, टी-शर्ट, मेडल, टाईम चिप, सर्टिफिकेट, बॅग, रेसचे फोटो आणि अल्पोपहार आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. शिवाय मॅरेथॉन दिवशी स्पर्धकांना झुंबा, नाशिक बेल, रॉक बँड, पोलीस बँड, मर्दानी खेळ, ढोल ताशा, पारंपरिक लेझीम, वाद्य आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.
क्रीडा नगरी अशी ओळख असलेले कोल्हापूर शहर फिट सिटी म्हणून नावारूपाला आली आहे. पारंपरिक खेळापासून ते अत्याधुनिक साहसी खेळांमध्ये इथल्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत दबदबा निर्माण केला आहे. या क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबरच नवोदित खेळाडू घडविणाच्या उद्देशाने तसेच कोल्हापूरचे पर्यटन वाढीसाठी डी. वाय. पाटील ग्रुप व केएससी रगेडियनने १२ फेब्रुवारी रोजी या अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले आहे.
स्पर्धकांना आपली नाव नोंदणी रग्गेडियन जिम, वायल्डर मेमोरियल चर्चच्या मागे, सासने ग्राउंड, न्यू शाहूपुरी, अजिंक्यतारा कार्यालय, ताराबाई पार्क व ॲब्स् जिम, हॉटेल सयाजी, येथे करता येईल. अधिक माहितीसाठी www.kolhapurrun.com या संकेतस्थळावर भेट द्यावी, किंवा ७७२२०६७४७७ व ८३१००२२५७या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा संयोजकांनी केले आहे.यावेळी आकाश कोरगावकर, चेतन चव्हाण, विजय कुलकर्णी, माळी सर, महेश शेळके, राज कोरगावकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, प्राचार्य डॉ. महादेव नरके, डी डी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.