Wednesday, September 11, 2024
Home ताज्या नुतनीकरण केलेला अंबाई जलतरण तलाव आम. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत खुला

नुतनीकरण केलेला अंबाई जलतरण तलाव आम. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत खुला

नुतनीकरण केलेला अंबाई जलतरण तलाव आम. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत खुला

कोल्हापूर/प्रतिनिधी : वीस लाख रुपये खर्च करून नुतनीकरण करण्यात आलेला अंबाई जलतरण तलाव आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पोहण्यासाठी खुला करण्यात आला. या तलावाच्या उर्वरित कामांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.क्रिडा नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात जलतरणाचीही वेगळी ओळख आहे. महापालिकेने १९७७ साली रंकाळा तलावा शेजारी अंबाई जलतरण तलावाची निर्मिती केली. या तलावात सराव करणाऱ्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केली. या तलावाची दुरवस्था झालेला हा टँक हा पोहण्यायोग्य करावा अशी मागणी केली जाता होती. आमदार ऋतुराज पाटील यांनी यासाठी पुढाकार घेत २० लाख रुपये खर्चातून या टँकचे नुतनीकरण करुन घेतले.
शनिवारी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत हा टँक पोहण्यासाठी खुला करण्यात आला. यावेळी आम. पाटील यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद ही साधला. टँकच्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करु अशी ग्वाही आम. पाटील यांनी यावेळी दिली. अंबाई टँकचे काम पूर्ण केल्याबद्दल पालकांनी आमदार पाटील यांचे आभार मानले. सकाळी ६ ते १० आणि दुपारी २ ते ६ या वेळेत हा टँक सुरु राहणार असून सायंकाळी ५ ते ६ या हा कालावधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
यावेळी महापालिकेचे माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राजेंद्र मगदूम, संभाजी पाटील, रंगराव पाटील, राकेश तिवले,महापालिकेचे इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, उपशहर अभियंता एन एस पाटील अभियंता अनिरुद्ध कोरडे, सचिन देवाडकर यांच्यास विद्यार्थी आणि त्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments