९ जानेवारीला राष्ट्रीय पातळीवर सौदर्य स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : गौरी इव्हेंट्स प्रस्तुत, संजय घोडावत ग्रुप स्पॉन्सर, स्टायलिंग पार्टनर वूमस्ते, क्यूझीन पार्टनर माणिकचंद आटा व सयाजी हॉटेल कोल्हापूर यांच्या सौजन्याने ९ जानेवारी २०२३ ला राष्ट्रीय पातळीवर सौदर्य स्पर्धा हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आलेली आहे.अशी महिती गौरी फॅशन क्लबच्या फाऊंडर व डायरेक्ट गौरी नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.या स्पर्धेमध्ये देशातील नाशिक,औरंगाबाद, धुळे,उस्मानाबाद,लातूर,दिल्ली, हरियाणा,वेस्ट बंगाल,गुजरात,जळगाव,मराठवाडा,पुणे,विदर्भ आदी विविध प्रांतातील विविध स्थरावरील स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेला आहे. कोल्हापूर मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर अशी स्पर्धा होत असून कोल्हापूरच्या कलानगरीचा वारसा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट, आणि विविध व्यवसायीक पातळीवर पोहचविण्याचा मानस या स्पर्धेतून पुढे येईल अशी माहिती गौरी इव्हेंट्सच्या संचालिका गौरी नाईक यांनी दिली. या पत्रकार परिषदेसाठी संजय घोडावत ग्रुप तर्फे विवेक गिरी तसेच गौरा इव्हेंट्स च्या संचालिका गौरी नाईक व संचालक जयंत पाटील उपस्थित होते.