Monday, July 15, 2024
Home ताज्या शिवसेनेच्या शाखा समाजकार्याचा केंद्रबिंदू ठरतील - श्री.राजेश क्षीरसागर

शिवसेनेच्या शाखा समाजकार्याचा केंद्रबिंदू ठरतील – श्री.राजेश क्षीरसागर

शिवसेनेच्या शाखा समाजकार्याचा केंद्रबिंदू ठरतील – श्री.राजेश क्षीरसागर

बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन, बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात शेकडो कार्यकर्त्यांचे प्रवेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केली. ८० % समाजकारण आणि २०% राजकारण हा मूलमंत्र शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या मूलमंत्रानुसार शिवसेनेचे समाजकार्य सुरु असून, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेला समाजकार्याचा वसा कायमपणे जपला जाईल. आगामी काळात नव्याने निर्माण होणाऱ्या आणि पुनर्बांधणी होणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या शाखा समाजकार्याचा केंद्रबिंदू ठरतील, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते भुयेवाडी येथे करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश करीत आगामी काळात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद वाढविण्याचा आणि समाजकार्याचा निर्धार केला.

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर म्हणाले, शिवसेनेच्या शाखा या शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीने शिवसैनिकांची एकसंघता, सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यारे, त्यांच्या समस्या सोडविणारे केंद्र आहेत. इतर राजकीय पक्षांच्या पेक्षा कितीतरी पटीने वरचढ सामाजिक कार्य हे फक्त शिवसेनेच्या शाखांमधून केले जाते. शासकीय कार्यालयातील कामकाज असो, शाळा – कॉलेज प्रवेश असो वा दवाखान्यांची कामे असो. सर्वसामान्यांच पहिलं पाऊल हे शिवसेनेच्या शाखांकडे वळत एवढा विश्वास सर्वसामान्य नागरिकांचा शिवसेनेच्या शाखांवर आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखांवरील सर्वसामन्य नागरीकांचा हाच विश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी समस्त शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांची असून, आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शाखांचे जाळे निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शाखा या समाजकार्याचा केंद्रबिंदू ठरतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर मा.सदस्य पंचायत समिती व मा.सदस्य जिल्हा नियोजन समिती,शिवसेना उद्धव ठाकरे गट उपजिल्हाप्रमुख ग्राहक सेना मा.श्री.कृष्णात पवार यांनी शेकडो कार्यकर्ते व ज्येष्ठ शिवसैनिकांसह मा.श्री राजेश क्षीरसागर कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ महाराष्ट्र राज्य व उपाध्यक्ष मित्र संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील, उदय भोसले, तुकाराम साळोखे, शहर प्रमुख रणजीत जाधव, उपशहरप्रमुख अंकुश निपाणीकर, कृष्णात आनंदा पोवार, दिलीप चव्हाण,अनंत पोवार, शांताराम घोरपडे, कृष्णात पाटील, केरबा तावडे, प्रकाश खोचिकर, रवि खोचिकर, महेश पाटील, सुशांत पाटील, बबन कोपार्डे, बाबासो पोवार, अजित पाटील, कृष्णात गराडे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleराजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अपात्र १ हजार ३४६ सभासदांना सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय, सतेज पाटील गटाला मोठा धक्का
Next article९ जानेवारीला राष्ट्रीय पातळीवर सौदर्य स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : गौरी इव्हेंट्स प्रस्तुत, संजय घोडावत ग्रुप स्पॉन्सर, स्टायलिंग पार्टनर वूमस्ते, क्यूझीन पार्टनर माणिकचंद आटा व सयाजी हॉटेल कोल्हापूर यांच्या सौजन्याने ९ जानेवारी २०२३ ला राष्ट्रीय पातळीवर सौदर्य स्पर्धा हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आलेली आहे.अशी महिती गौरी फॅशन क्लबच्या फाऊंडर व डायरेक्ट गौरी नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.या स्पर्धेमध्ये देशातील नाशिक,औरंगाबाद, धुळे,उस्मानाबाद,लातूर,दिल्ली, हरियाणा,वेस्ट बंगाल,गुजरात,जळगाव,मराठवाडा,पुणे,विदर्भ आदी विविध प्रांतातील विविध स्थरावरील स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेला आहे. कोल्हापूर मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर अशी स्पर्धा होत असून कोल्हापूरच्या कलानगरीचा वारसा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपट, आणि विविध व्यवसायीक पातळीवर पोहचविण्याचा मानस या स्पर्धेतून पुढे येईल अशी माहिती गौरी इव्हेंट्सच्या संचालिका गौरी नाईक यांनी दिली. या पत्रकार परिषदेसाठी संजय घोडावत ग्रुप तर्फे विवेक गिरी तसेच गौरा इव्हेंट्स च्या संचालिका गौरी नाईक व संचालक जयंत पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments