Tuesday, July 23, 2024
Home ताज्या झारखंडमधील सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन समाज आक्रमक,मूक मोर्चाने जैन बांधव उतरले रस्त्यावर

झारखंडमधील सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन समाज आक्रमक,मूक मोर्चाने जैन बांधव उतरले रस्त्यावर

झारखंडमधील सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन समाज आक्रमक,मूक मोर्चाने जैन बांधव उतरले रस्त्यावर

कोल्हापूर/प्रतिनिधी : तीर्थक्षेत्र असलेल्या झारखंडमधील सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन समाज आक्रमक झाला आहे.आज जैन समाजाच्या वतीने आज दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. “आपण सगळे एक होऊ या -शिखरजी वाचवू या” अशी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारला इशारायावेळी दिला गेला.                       दसरा चौकातून  सकाळी हा मोर्चा सुरू झाला. जिल्ह्याच्या विविध भागातून जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाली होते.शहराच्या प्रमुख मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यामध्ये तरूण आणि महिलांची संख्याही लक्षणीय होती.”सम्मेद शिखरजी पवित्र स्थळ है, पर्यटन स्थळ नही बनेगा”, ‘सम्मेद शिखरजी जैनांच्या हक्काचे – नाही कोणाच्या बापाचे’ असा इशारा या मोर्चाद्वारे देण्यात आला.  जैन धर्म की जान है शिखर सम्मेद महान है, सब जैनोंका नंदन- सम्मेद शिखरजी को वंदन, सब जैनोंका नारा है-शिखरजी हमारा है, आपण सगळे एक होऊ या -शिखरजी वाचवू या, सरकार को जगाओ-शिखरजी बचाओ, श्री सम्मेद शिखरजी तीर्थ बचाओ, श्री सम्मेद शिखरजी पवित्र स्थळ- पर्यटन स्थळ नही बनेगी, आन-बान-शान, शिखरजी हमारी पहचान”या आशयाचे फलक नागरिकांच्या हाती होते. हातात जैन समाजाचा पंचरंगी झेंडा, डोक्यावर शिखरजी बचाव असा मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान करत जैन समाज सहभागी झाला.                                                        दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक गुजरी, महाद्वार रोड पापाची तिकटी, महापालिका चौक, सी पी आर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मागणीचे निवेदन सादर केले. या मोर्चाचे नेतृत्व जगदगुरू स्वतिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, अभिनव स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह अनेकांनी केले.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments