कैलासगडची स्वारी मंदिरात दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या तैलचित्राचे अनावरण
कोल्हापूर/प्रतिनिधी : मंगळवार पेठ येथील कैलासगडची स्वारी मंदिरात दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या तैलचित्राचे अनावरण आज करण्यात आले. या समारंभात सर्वांनीच आण्णांच्या आठवणी जागवल्या.दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे उत्कृष्ट फुटबॉलपट्टू, यशस्वी उद्योजक, प्रत्येक गरजवंताच्या मदतीला धावून जाणारे मदतगार, सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आदर्श सामाजिक नेतृत्व आणि कोल्हापूर शहराच्या विकासाचे व्हीजन घेऊन सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, संस्कृतिक, उद्योग, आरोग्य अशा विविध क्षेत्रात कर्तत्वाने ठसा उमटवलेले अष्टपैलू व्यक्तीमत्त्व व कोल्हापूर शहराचे लोकप्रिय आमदार होते. त्याचबरोबर ते मंगळवार पेठ येथील कैलासगडची स्वारी मंदिराचे निस्सीम भक्त होते. याचबरोबर या ट्रस्टचे ते उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहत होते.
यामुळे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या तैलचित्राचे अनावरण आज कैलासगडची स्वारी मंदिरात करण्यात आले आहे. आण्णांच्या सामाजिक, औद्योगिक, धार्मिक जीवनाचा प्रवासाचे दर्शन या तेलचित्रांमध्ये घडते.
यावेळी आमदार जयश्री जाधव, कैलासगडची स्वारी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बबेराव जाधव,केशवराव पोवार, दीपक जाधव, विठ्ठलराव जाधव, शिवाजी जाधव, अजितराव जाधव, गणेश भोसले, शरद गौड, अनिल गौड, अजित जाधव, अजित आयरेकर, उत्तम भोसले, राजू गौड, बबलू जाधव आदी उपस्थित होते.