Friday, September 13, 2024
Home ताज्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये ४८ व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये ४८ व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

संजय घोडावत युनिव्हर्सिटी मध्ये ४८ व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन – तीस लाख रुपयांची रोख बक्षीसे

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटी,अतिग्रे येथे सोमवार दि २६ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान एपीएल ४८ व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केल्या आहेत. रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना,अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना,महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण ११ फेऱ्यात घेण्यात येणार आहेत. २६ डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजता स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होणार आहे. साधारण पाच तासाची दररोज एक फेरी याप्रमाणे एकूण 11 दिवस म्हणजे 5 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.दिल्लीचे MPL स्पोर्ट्स फाउंडेशन हे मुख्य स्पर्धा प्रायोजक असून संजय घोडावत युनिव्हर्सिटी सहप्रायोजक आहे.आमदार राजू आवळे, चितळे डेअरी (भिलवडी), जैन इरिगेशन(जळगाव),सिद्धार्थ मयूर,अनिरुद्ध देशपांडे,नरेंद्र फिरोदिया,सचिन शिरगावकर व पल्लवी कोरगांवकर या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले आहे. अंतिम अकराव्या फेरीनंतर पहिल्या येणाऱ्या दहा क्रमांकाना एकूण रोख तीस लाख रुपयाची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. आहे.विविध राज्यातून ११० नामांकित महिला बुद्धिबळपटूनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये तीन आंतरराष्ट्रीय मास्टरसह आठ महिला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर,अकरा महिला आंतरराष्ट्रीय मास्टर व बारा महिला आंतरराष्ट्रीय फिडे मास्टर चा सहभाग आहे. महिला आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर दिल्लीच्या वंटीका अगरवाल ला या स्पर्धेत अग्रमानांकन मिळाले आहे तर गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर दिव्या देशमुख ला द्वितीय मानांकन मिळाले आहे. माजी विजेती पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथनला तृतीय मानांकन मिळाले आहे.चौथे मानांकन पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या महिला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर व माजी विजेती मेरी आना गोम्स ला मिळाले आहे.नुकताच अर्जुन पुरस्कार मिळालेले महिला आंतरराष्ट्रीय मास्टर व माजी विजेती गोव्याच्या भक्ती कुलकर्णी ला पाचवे मानांकन मिळाले आहे.पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर एम् महालक्ष्मी सहावी मानांकित आहे.आंध्र प्रदेशची महिला ग्रँडमास्टर प्रत्थुशा बोडा ला सातवे मानांकन आहे. कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय महिला मास्टर ऋचा पुजारीला या स्पर्धेत आठवे मानांकन मिळाले आहे.महाराष्ट्र ची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर साक्षी चितलांगी नववी मानांकित आहे तर कर्नाटक ची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर इशा शर्मा दहावे मानांकन मिळाले आहे.
घरबसल्या प्रेमींना स्पर्धअखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या वेबसाईटवर व फॉलो चेस आणी चेस डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. ही माहिती देताना
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीष चितळे, सचिव निरंजन गोडबोल,संजय घोडावत युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ.अरुण पाटील, विश्वस्त विनायक भोसले, पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी, बुद्धिबळ संघटनेचे भरत चौगुले,मनीष मारुलकर,आंतरराष्ट्रीय महिला मास्टर ऋचा पुजारी,धीरज वैद्य,संदीप पाटील,आरती मोदी ‘ आदित्य आळतेकर यां वेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर विभागातील ३१ विद्यार्थ्यांना मेडिकल आणि ३२७ विद्यार्थ्यांना इंजिनिअरींगच्या विविध शाखांमध्ये प्रवेश

चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर विभागातील ३१ विद्यार्थ्यांना मेडिकल आणि ३२७ विद्यार्थ्यांना इंजिनिअरींगच्या विविध शाखांमध्ये प्रवेश कोल्हापूर/प्रतिनिधी : देश व राज्य पातळीवरील विविध वैद्यकिय आणि अभियांत्रिकी...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

Recent Comments