Saturday, November 30, 2024
Home ताज्या धोंडी चंप्या’च्या प्रमोशनदरम्यान भरत जाधव यांनी पत्रकारांसोबत साजरा केला वाढदिवस

धोंडी चंप्या’च्या प्रमोशनदरम्यान भरत जाधव यांनी पत्रकारांसोबत साजरा केला वाढदिवस

‘धोंडी चंप्या’च्या प्रमोशनदरम्यान भरत जाधव यांनी पत्रकारांसोबत साजरा केला वाढदिवस

कोल्हापूर/प्रतिनिधी : ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा, या चित्रपटाच्या प्रमोशनकरता भरत जाधव आणि संपूर्ण टीम वेगवेळ्या शहरांमध्ये प्रमोशन करत आहे. या प्रमोशनदरम्यान म्हणजेच १२ डिसेंबर रोजी भरत जाधव यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी आपला वाढदिवस आपल्या पत्रकार मित्रांसोबत कोल्हापूर येथे केक कापून साजरा केला. या वेळी त्यांनी पत्रकारांसोबत गप्पाही मारल्या.
‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा, या सिनेमात गोष्ट एका रेडा आणि म्हशीची म्हणजे धोंडी आणि चंप्याची असून या प्रेमकहाणीत आणखी एक प्रेमकहाणी लपलेली आहे. ती म्हणजे सायली आणि निखिलची म्हणजेच ओवी आणि आदित्यची. या सगळ्यांच्या प्रेमाच्या आड येत आहेत, अंकुश आणि उमाजी, म्हणजे भरत जाधव आणि वैभव मांगले. हे दोघं एकाच गावचे असून दोघांमध्ये शत्रुत्व असल्याने त्यांच्यात सतत खटके उडताना दिसत आहेत. आता धोंडी-चंप्या आणि ओवी-आदित्यची यांचे प्रेम यशस्वी होणार का, की शत्रुत्व जिंकणार हे प्रेक्षकांना १६ डिसेंबरपासून चित्रपटगृहात कळेल.
या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. सौरभ आणि दुर्गेश यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांना गणेश निगडे, गुरू ठाकूर आणि मंदार चोळकर यांचे बोल लाभले आहेत. तर अवधूत गुप्ते, वैशाली सावंत, सना मोइदुट्टी, सौरभ शेटये यांनी ही गाणी गायली आहेत.
रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित ‘धोंडी चंप्या – एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन बनवण्यात आला असून याची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत. सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे सहनिर्माते आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments