Wednesday, July 17, 2024
Home ताज्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागात एसटीची वाहतूक अंशत: रद्द

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागात एसटीची वाहतूक अंशत: रद्द

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागात एसटीची वाहतूक अंशत: रद्द

मुंबई: (दि. ०७ डिसेंबर,) गेली काही दिवस महाराष्ट्र –कनार्टक सीमावर्ती भागात प्रक्षोभक वातावरण निर्माण झाले आहे. आशा पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनूसार एसटी महामंडळाने आपल्या कर्नाटकात जाणा-या दैनदिन ११५६ फे-यापैकी ३८२ फे-या पुढील सूचना येईपर्यत अंशत: रद्द ठेवल्या आहेत.
महाराष्ट्राच्या विविध विभागातून सुटना-या एसटी बसेस नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिधुंदुर्ग या जिल्हयातून कर्नाटक राज्यात जातात. यापैकी कोल्हापूरातून निपाणी-बेळगाव मार्गे जाणा-या सुमारे ५७२ फे-यापैकी ३१२ फे-या स्थानिक जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत. तथपी, गडहिंगलज, चंदगड, आजरा, तळ कोकण व गोवाल्या जाणा-या बस फे-या निपाणी ऐवजी अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तसेच सांगली जिल्हयातील कर्नाटक राज्यात जाणा-या ६० फे-यापैकी २२ फे-या स्थानिक प्रशासनाच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य विभागातील संवेदनशील मार्गावरील ४८ फे-या रद्द केल्या आहेत.
कोल्हापूर शहरातून श्री. क्षेत्र सौंदत्ती येथे सुमारे ७००० भाविकांना घेऊन गेलेल्या १४५ एसटी बसेस आज मध्यरात्री पर्यत कोल्हापूरात सुखरुप दाखल होतील. या बाबतीत आवश्यकता वाटल्यास कनार्टक पोलीस प्रशासनाने संबधित बसेसनां पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. आज दत्त जयंती निमित्य राज्यातील अनेक तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयाच्या सीमावर्ती भागात कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे श्री.दत्त जंयती निमित्त यात्रा, भरविण्यात आली आहे. या यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून सोलापूर-अक्कलकोट-गाणकापूर या मार्गावर जादा वाहतूक केली जात आहे. तेथे कोणतेही विघ्न आलेले नसून, यात्रा सुरळीत सुरु आहे.

जनसंपर्क अधिकारी (एसटी महामंडळ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments