श्रीपाद कुलकर्णी स्मृती भव्य खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेस प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मानांकितांची पीछेहाट
कोल्हापूर/४ डिसेंम्बर २०२२ :- राम गणेश गडकरी हॉल पेटाळा, कोल्हापूर येथे आज श्रीपाद कुलकर्णी स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय जलद गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा प्रचंड उत्साहात प्रारंभ झाल्या.या स्पर्धेत,तामिळनाडू,कर्नाटक,गोवा, व स्थानिक महाराष्ट्रातील एकूण 296 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत.यापैकी एक आंतरराष्ट्रीय मास्टर सह 138 आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू आहेत. कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष व स्पर्धा प्रायोजक मुग्धा कुलकर्णी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चालू करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.तत्पूर्वी श्रीपाद कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्रायोजक श्रीनिवास कुलकर्णी, श्रीमती स्नेहा कुलकर्णी ,शरयू कुलकर्णी , आंतरराष्ट्रीय पंत भरत चौगुले, मनीष मारुलकर, उत्कर्ष लोमटे इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.स्पर्धा निदेशक अनिल राजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्विस लीग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात ही स्पर्धा होणार आहे आज झालेल्या सहाव्या फेरीनंतर मानांकित औरंगाबादचा इंद्रजीत महेंद्रकर,कोल्हापूरचा श्रीराज भोसले व नागपूरचा पियांशु पाटील हे तिघेजण सहा गुणासह संयुक्तपणेे आघाडीवर आहेत.द्वितीय मानांकित पुण्याचा अनिरुद्ध देशपांडे,तामिळनाडूचा एस् विग्नेशन व कोल्हापूरचा प्रणव पाटील हे तिघेजण साडेपाच गुणासह संयुक्तपणे द्वितीयस्थानावर आहेत.अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर समीर कटमाळे सह अखिलेश नागरे,रवींद्र निकम,वीरेश शरणार्थी,सिद्धांत तम्हनकर,श्लोक शरणार्थी,विक्रमादित्य चव्हाण,किरण पंडितराव,आदित्य सावळकर,दत्तात्रेय राव,अभिषेक गणीगेर,निलेश चितळकर, मंदार साने,शर्विल पाटील,मिहीर श्रीखंडे आदित्य गद्रे व अभय भोसले हे सतरा जण पाच गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.
स्पर्धेसाठी कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,इचलकरंजीचे करण परीट, रत्नागिरीचे विवेक सोहोनी हे मुख्य पंच आहेत.त्यांच्याबरोबर मनीष मारुलकर, दीपक वायचळ जयश्री पाटील,उत्कर्ष लोमटे व आरती मोदी,सूर्याची भोसले,रोहित पोळ व विकास भेंडीगिरी हे सहाय्यक पंच म्हणून काम पाहत आहेत.